PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक
PM Modi’s Sharp Attack on RJD-Congress Alliance in Bihar: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहरसा सभेत काँग्रेस आणि आरजेडीवर जोरदार हल्ला चढवला. बिहारमधील विकास प्रकल्प रोखल्याचा आरोप त्यांनी यूपीए सरकारवर केला.
सहरसा : बिहारमध्ये ‘आरजेडी’च्या हातून सत्ता गेल्यानंतर आरजेडीने यूपीए सरकारवर दबाव आणून बिहारमधील विकास प्रकल्प रोखले होते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बिहारमधील सहरसा येथील सभेत बोलताना केला.