Narendra Modi and Nehru : ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

Narendra Modi’s Historic Political Journey: पंतप्रधान मोदींबद्दल असेही म्हटले जाते की ते सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते आहेत.
Prime Minister Narendra Modi likely to break Jawaharlal Nehru’s record as India’s longest-serving leader, marking a significant political milestone.
Prime Minister Narendra Modi likely to break Jawaharlal Nehru’s record as India’s longest-serving leader, marking a significant political milestone. esakal
Updated on

Modi will Breaks Nehru’s Record: पंतप्रधान मोदींच्या नावावर आज आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहण्याच्या बाबातीत पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडला असून, ते या विक्रमाच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षे आणि ६० दिवस सत्तेत पूर्ण केले आहेत. अशाप्रकारे, त्यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा आणखी एक विक्रम मोडला आहे. पंतप्रधान मोदी आता फक्त जवाहरलाल नेहरूंपेक्षा मागे आहेत, ज्यांनी सलग १६ वर्षे आणि २८६ दिवस पंतप्रधानपद भूषवले आहे.

मात्र मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचाही विक्रम मोडीत काढतील, असंच सध्यातरी चित्र आहे. ११ जुलै २०२६ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान पंडीत  जवाहरलाल नेहरूंना या यादीत मागे टाकतील. कारण, नेहरुंच्या नावावर ४ हजार ४२५ दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम आहे, तर आता सध्या मोदींना ४ हजार ०७८ दिवस पंतप्रधान पदावर झाले आहेत. याशिवाय इंदिरा गांधी ४ हजार ०७७ दिवस पंतप्रधान पदावर होत्या, ज्या आता तिसऱ्या क्रमांकावर गेल्या आहेत.  

जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी दोघांनीही चार वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली, परंतु फरक इतकाच होता की नेहरू सतत जिंकत राहिले आणि सत्तेत राहिले, तर आणीबाणीनंतर इंदिरा गांधींना काही काळासाठी त्यांची सत्ता गमवावी लागली होती.

Prime Minister Narendra Modi likely to break Jawaharlal Nehru’s record as India’s longest-serving leader, marking a significant political milestone.
Ravindra Chavan on Cabinet Reshuffle: महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदल होणार? ; भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांनी स्पष्टच दिलं उत्तर, म्हणाले...

पण जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याचा विचार येतो तेव्हा पंतप्रधान मोदी अजूनही जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींपेक्षा मागे आहेत. कारण नेहरू आणि इंदिरा यांनी चार वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे,  तर मोदींनी तीनवेळा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे, जर मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली तर ते याबाबतीतही अव्वल क्रमांकावर येतील.

Prime Minister Narendra Modi likely to break Jawaharlal Nehru’s record as India’s longest-serving leader, marking a significant political milestone.
India UK Free Trade Deal: भारत अन् ब्रिटनमध्ये मुक्त व्यापर करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या, काय स्वस्त अन् काय महागणार?

पंतप्रधान मोदींबद्दल असेही म्हटले जाते की ते सलग दोन कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले गैर-काँग्रेसी नेते आहेत. याआधी अटलबिहारी वाजपेयी देखील भाजप नेते होते परंतु त्यांचा कार्यकाळ फक्त ६ वर्षांचा होता आणि तोही सलग नव्हता. त्यांच्याशिवाय मोरारजी देसाई, चरणसिंग, चंद्रशेखर, गुजराल, एचडी देवगौडा हे देखील काही पंतप्रधान होते ज्यांनी थोड्या काळासाठी सरकार चालवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com