esakal | ‘मोहनजी, कैसे हो, अपना ख्याल रखिएगा’
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra-Modi

जनसंघाचे ७६ वर्षीय नेते मोहनलाल बौठीयाल यांनी दूरध्वनीवर हे शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याचे कारण अशी विचारपूस करणारी व्यक्ती सुद्धा खास अशीच होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनभाईंशी संवाद साधला.

‘मोहनजी, कैसे हो, अपना ख्याल रखिएगा’

sakal_logo
By
पीटीआय

डेहराडून - ‘मोहनजी, कैसे हो, और क्या हो रहा है, आपका स्वास्थ्य ठीक है ना, अपना ख्याल रखिएगा.’’

जनसंघाचे ७६ वर्षीय नेते मोहनलाल बौठीयाल यांनी दूरध्वनीवर हे शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. याचे कारण अशी विचारपूस करणारी व्यक्ती सुद्धा खास अशीच होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहनभाईंशी संवाद साधला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान कार्यालयातून बुधवारी सकाळी आठ वाजून २६ मिनिटांनी फोन आला तेव्हा मोहनभाई उत्तराखंडमधील पौरी जिल्ह्यातील दौगद्दा जवळील एटा खेड्यातील आपल्या गव्हाच्या शेतात फेरफटका मारत होते. सुमारे तीन मिनिटांच्या संवादात पंतप्रधांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.

बद्रीनाथमध्ये १९९८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान आणि २०१४ मध्ये गढवालमधील श्रीनगर येथील निवडणूक प्रचार सभेदरम्यान त्यांची भेट झाली होती. तेव्हाचे संदर्भ त्यांनी सांगितले.

मोदी यांनी मोहनभाईंना सांगितले की, अशा संकटसमयी मी जनसंघाच्या काळातील जुन्या मित्रांशी बोलायचे ठरविले आहे. मोहनलाल म्हणाले की, जेव्हा पंतप्रधान दूरध्वनी करतात तेव्हा कार्यकर्त्यासाठी तो सन्मान असतो. अशा गुणांमुळे मोदीजी हे जनतेसाठी नायक ठरले आहेत. मोहनभाई १९६० मध्ये जनसंघात दाखल झाले. उत्तराखंडमधील भाजपचे संस्थापक सदस्य मोहनभाई यांनी उत्तर प्रदेशच्या विभाजनानंतर अनेक महत्त्वाची पदे भूषविली.