Narendra Modi : नकारात्मक राजकारणाचा पराभव : मोदी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील ऐतिहासिक भाजप विजयावर भाष्य करत नकारात्मक राजकारणाचा पराभव झाला असल्याचे सांगितले. त्यांनी राज्याच्या जनतेच्या विकासवादावर भर दिला आणि सुशासनाचा विजय समोर ठेवला.
Narendra Modi
Narendra Modi sakal
Updated on

नवी दिल्ली : ‘‘महाराष्ट्रात  विकासवादाचा, सुशासनाचा आणि खऱ्या सामाजिक न्यायाचा विजय झाला असून खोटेपणा, कपट, विभाजनकारी शक्ती, नकारात्मक राजकारण आणि घराणेशाहीचा अतिशय वाईट पराभव झाला आहे,’’ अशा शब्दांत  भाजप-महायुतीच्या महाविजयाचे वर्णन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. लांगुलचालनाचा सामना कसा करायचा हे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने दाखवून दिले असे मोदींनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com