PM Narendra Modi : ''पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही'', मोदींचा काँग्रेसला टोला, म्हणाले...

PM Narendra Modi
PM Narendra Modiesakal

ओडिशा (पीटीआय)ः ‘‘पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जगाला भारताचे आण्विक सामर्थ्य दाखवून दिले होते. काँग्रेसचे लोक मात्र पाकिस्तानी अणुबाँबवरून भारतालाच भीती घालत आहेत. पाकिस्तानकडून कुणीही अणुबाँब खरेदी करत नाही कारण त्याची गुणवत्ता सगळ्या जगाला ठावूक आहे,’’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील सभेत बोलताना लगावला.

‘या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला ५० जागाही मिळणार नाहीत तसेच त्यांना विरोधी पक्षाचा दर्जाही प्राप्त करता येणार नाही,’ असेही मोदी म्हणाले. राज्यामध्ये लवकरच डबल इंजिनचे सरकार सत्तेमध्ये येणार असून ज्याला उडिया भाषा आणि संस्कृती समजते त्या भूमिपुत्राला मुख्यमंत्री करण्यात येईल, असेही मोदी यांनी नमूद केले. ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपदा असताना देखील बिजू जनता दलाने या राज्याला कायम मागास ठेवले अशी टीकाही त्यांनी केली.

मोदी म्हणाले, ‘‘ काँग्रेसचे शहजादे २०१४ मधील स्क्रिप्ट वाचण्याचे काम करत आहेत. याखेपेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) विक्रम रचेल हे माझे शब्द लक्षात ठेवा. यावेळेस एनडीए चारशेपेक्षाही अधिक जागांवर विजयी होईल.’’ वाजपेयी सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा दाखला देताना ते म्हणाले,‘‘ तब्बल २६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने पोखरणमध्ये अणुचाचणी घेतली होती. यामुळे देशाची प्रतिमाही उंचावली होती. अयोध्येत राममंदिराची उभारणी करून आम्ही या देशातील जनतेचे पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण केले. एका आदिवासी महिलेला आम्ही देशाचे राष्ट्रपती बनविले. ओडिशा हे नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध राज्य आहे पण येथील जनता मात्र गरीब आहे.’’

PM Narendra Modi
Water Issue : मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटला; धरणात जलसमाधीसाठी जात असलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले

पाकव्याप्त काश्मीर हा भारताच्या मालकीचा आहे. पाकिस्तानच्या गोळीला आम्ही तोफगोळ्याने उत्तर देऊ. अणुबाँबची भीती दाखवून काँग्रेस आपण या भागावरील हक्क सोडून द्यावा अशी भाषा करू लागली आहे.
- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, (हैदराबादेतील प्रचारसभेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com