मोदी सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय : एस जयशंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S. Jaishankar

'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय.'

मोदी सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय : एस जयशंकर

तिरुवनंतपुरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारनं परराष्ट्र धोरणात सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिलंय. त्यामुळं आम्ही सुरक्षेला नेहमीच प्राधान्य देत असतो. खरं तर आमच्या परराष्ट्र धोरणात 'सुरक्षा' ही प्रथम क्रमांकाची प्राथमिकता आहे, असं स्पष्ट मत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा: JEE Main : मजूर आई-बापाच्या पोरानं JEE परीक्षेत मिळवले 99.93 टक्के गुण

जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली

एस जयशंकर यांनी अलीकडंच बाली इथं झालेल्या G-20 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेच्या वेळी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. दरम्यान, दोन्ही बाजूंनी सीमेचा प्रश्न लवकरात-लवकर सोडवण्यासाठी चर्चा झाल्याचं कळतंय.

हेही वाचा: Bihar : दोन मुलांच्या आईचं फेसबुकवरुन 15 वर्षाच्या मुलावर जडलं प्रेम

गलवान संघर्षात 20 जवान शहीद

2020 मधील गलवान संघर्षानंतर अडथळे सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. 15 आणि 16 जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत 20 भारतीय जवान शहीद झाले होते. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी लष्करी कारवाईच्या विरोधात संघर्ष सुरू झाला.

Web Title: Narendra Modi Government Has Given First Priority To Security In Foreign Policy S Jaishankar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..