esakal | कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी

कोरोनाच्या लाटेचे संकट ‘मोदीनिर्मित’; ममता बॅनर्जी

sakal_logo
By
पीटीआय

बालूरघाट (पश्‍चिम बंगाल) - ‘देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट आण त्याचे व्यवस्थापन म्हणजे ‘मोदीनिर्मित संकट’ आहे, अशी कठोर टीका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली.

बालूरघाटच्या सभेत बोलताना पश्‍चिम बंगालचा कारभार मोदी यांच्या डबल इंजिनने नाही तर बंगाली इंजिन सरकारने चालू शकतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. देशातील कोरोना स्थितीचा उल्लेख करीत ‘‘ कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक आहे. हे मोदी निर्मित संकट आहे. येथे इंजेक्शन व ऑक्सिजनचा तुटवडा असून देशात लशींची व औषधांचा कमतरता असूही ते विदेशात पाठविण्यात आले आहे,’’ अशी टीका त्यांनी केंद्रावर केली.

‘ही निवडणूक म्हणजे बंगालच्या बचावाची आणि बंगाली मातेच्या सन्मानाचे रक्षण करण्याची लढाई आहे. आपले राज्य मोदींचे डबल इंजिन नाही तर बंगाली इंजिनचे सरकार चालवू शकते. दिल्लीतून आपल्या राज्याचा कारभार चालविण्यासाठी आम्ही गुजरातला बंगालचा ताबा घेऊ देणार नाही. बंगालीच बंगालवर राज्य करेल,’’ असा विश्‍वास व्यक्त केला.

हेही वाचा: कोव्हॅक्सिन लस कोरोनावर 78 टक्के प्रभावी; भारत बायोटेकचा दावा

डावे व काँग्रेसच्या संयुक्त मोर्चाच्या उमेदवारांना मत न देण्याचे आवाहन करीत त्यांना मत देण्याने भाजपचे हात आणखी बळकट करण्यासारखे आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या. पश्‍चिम बंगालमध्ये आलेल्या निर्वासितांना जमीन हक्क दिले आहेत, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. ‘‘तुम्ही सर्व या राज्याचे नागरिक आहात. काळजी करू नका, मी पहारेकराची भूमिका निभावेन,’’ अशी ग्वाही त्यांनी दिली

सायंकाळी सहानंतर मतदान करा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी रुग्‍णांच्‍या निवासाची सोय करणे कठीण होत आहे, कारण अनेक सरकारी जागा केंद्रीय दलांच्या निवासासाठी दिल्या आहेत. कोरोनारुग्णांसाठी खाटांची संख्या वाढविली असली तरी ज्या रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, त्यांनी गृहविलगीकरणात रहावे, अशी सूचना त्यांनी दिली. सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनारुग्णांनी सायंकाळी सहानंतर मतदान करावे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले.

loading image