Narendra Modi News: "काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे..."; विरोधकांच्या बैठकीवर नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi News
Narendra Modi News

Narendra Modi News: बंगळुरू येथे विरोधकांची आज बैठक आहे. या बैठकीत देशभरातील दिग्गज विरोधी नेते सहभागी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व विरोधक भाजपविरोधात एकवटले आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र यांनी विरोधकांच्या बैठकीवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोर्ट ब्लेअरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते.

कुटुंबाला वाचवणे हे विरोधकांचे एकमेव ध्येय आहे. विरोधकांची बैठक म्हणजे 'एक चेहरे पे कई चेहरे है', असे मोदी म्हणाले. (latest marathi news)

विरोधी पक्षांच्या ऐक्याबाबत बंगळुरूमध्ये झालेल्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी टोला लगावला. विरोधकांवर खरपूस समाचार घेत ते म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभदायक कामांनाच प्राधान्य देत असतो. यामुळे आदिवासी भागातील लोक विकासापासून वंचित राहीले.

Narendra Modi News
Adani on Hindenberg Report : आमची बदनामी करण्यासाठी हिंडेनबर्गने दिला होता चुकीचा रिपोर्ट - गौतम अदानी

काँग्रेसवर निशाणा साधताना नरेंद्र मोदी म्हणाले, काही पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे विकासाचे फायदे देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचले नाहीत.

यादरम्यान राहुल गांधी, एमके स्टॅलिनपासून लालू यादवांपर्यंत सर्वांवर नरेंद्र मोदी यांनी हल्लाबोल केला. या लोकांना भ्रष्टाचाराची प्रचंड ओढ आहे. हे लोक कुटुंबवादाचे कट्टर समर्थक आहेत. बंगळुरू मध्ये सर्भ भ्रष्टाचारी लोक एकत्र आले आहेत, असे मोदी म्हणाले.

Narendra Modi News
Rahul Gandhi Defamation Case: शिक्षेला स्थगिती देण्याची राहुल गांधींची याचिका मंजूर, सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com