Narendra Modi : पंतप्रधान म्हणाले, कॅन्सरला घाबरण्याची गरज नाही; कारण...

आमचे सरकार आरोग्य क्षेत्रातील सहा गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत आहे
Narendra Modi Latest News
Narendra Modi Latest NewsNarendra Modi Latest News

Narendra Modi Latest News मोहाली : कर्करोगाला घाबरण्याची गरज नाही. मी अनेक लोकांना ओळखतो ज्यांनी कर्करोगावर मात केली आहे. कर्करोगाविरुद्धच्या (Cancer) लढाईत ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल त्या सरकारकडून पुरवल्या जातील. देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील मोहाली येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते. २०१४ पूर्वी देशात ४०० पेक्षा कमी वैद्यकीय महाविद्यालये होती. अवघ्या आठ वर्षांत देशभरात २०० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Narendra Modi Latest News
Koffee With Karan : 2 सेलिब्रिटींना करण कधीही शोमध्ये आमंत्रित करणार नाही; कारण...

आमचे सरकार आरोग्य क्षेत्रातील सहा गोष्टींवर लक्ष केंद्रित करीत आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, अगदी खेड्यातही सुविधा, प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये आणि पॅरामेडिकलची संख्या वाढवणे. याशिवाय तंत्रज्ञानाचा विस्तार आणि कमी किमतीत औषधांची उपलब्धता हेही आमच्या अजेंड्यावर आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.

मोहालीत (Mohali) बांधलेल्या रुग्णालयात एमआरआय, मॅमोग्राफी, डिजिटल रेडिओग्राफी यासारख्या सुविधा असतील. त्यामुळे लोकांना उपचार आणि संबंधित चाचण्यांसाठी भटकंती करावी लागणार नाही. पंजाब आणि हरयाणासारख्या राज्यांमध्ये कॅन्सर (Cancer) केअर हॉस्पिटलची मागणी बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. फरिदाबादमधील २,६०० खाटांच्या अमृता रुग्णालयाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पंजाब गाठले आणि रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली.

या रुग्णालयात ३०० खाटा उपलब्ध आहेत. कर्करोगावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक सुविधाही येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. हे टाटा मेमोरियल सेंटरने ६६० कोटींच्या निधीतून तयार केले आहे. पंजाब व्यतिरिक्त हे हॉस्पिटल जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंडमधील लोकांना मोठी सुविधा देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com