‘मोदी-२’ची जय्यत तयारी; देशभरात कार्यक्रमांचा धडाका

नरेंद्र मोदी सरकारच्या एकूण ८ व्या व दुसऱ्या कार्यकाळातील तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात कार्यक्रमांचा धडाका करण्याचे नियोजन भाजपने केले आहे.
Narendra Modi
Narendra Modisakal
Summary

नरेंद्र मोदी सरकारच्या एकूण ८ व्या व दुसऱ्या कार्यकाळातील तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात कार्यक्रमांचा धडाका करण्याचे नियोजन भाजपने केले आहे.

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या (Government) एकूण ८ व्या व दुसऱ्या कार्यकाळातील तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त (Third Anniversary) देशभरात कार्यक्रमांचा (Event) धडाका करण्याचे नियोजन भाजपने (BJP) केले आहे. किमान ११ ठळक उपक्रमांभोवती (नमो-एकादशसूत्री) व अन्य मुद्यांबाबत वर्धापनदिन सोहळ्याची आखणी करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी कार्यक्रमांच्या आखणीबाबत आज दीर्घ चिंतन-मंथन केले.

३० मे २०१९ रोजी टीम मोदी -२ चा भव्य शपथविधी पार पडला होता. यंदाचा वर्धापनदिन सोहळा जंगी करण्यात कोणतीही कसर सोडायची नाही, असा भाजपचा निर्धार आहे. जम्मू-काश्मीरचे कलम ३७० रद्द करणे, तोंडी तलाक प्रथेला फाटा, नागरिकत्व दुरूस्ती कायदा असे निर्णय मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळाच्या प्रारंभीच केले होते.

देशभरात गुंजणार हनुमान चालीसा

भोंग्यांना हनुमान चालिसाद्वारे प्रत्युत्तर ही संघाची भूमिका व त्याअनुषंगाने तयार झालेले वातावरण पहाता या स्त्रोत्रांचा २६ मे (गुरूवार) रोजी देशभरात एकाच वेळी पाठ करण्याचीही योजना भाजपने आखली आहे. २६ मे २०१४ रोजी मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com