मोदींनी कर्मचाऱयांच्या मुलींकडून राखी बांधून रक्षाबंधनाचा सण केला साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱयांच्या मुलींकडून राखी बांधून घेऊन आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
Narendra Modi Rakshabandhan Celebration
Narendra Modi Rakshabandhan Celebrationsakal
Summary

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱयांच्या मुलींकडून राखी बांधून घेऊन आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान कार्यालयातील कर्मचाऱयांच्या मुलींकडून राखी बांधून घेऊन आज रक्षाबंधनाचा सण साजरा केला. हर घर तिरंगा ही मोहीम सुरू असल्याने पंतप्रधानांनी या मुलींना भेट म्हणून प्रत्येकी तिरंगा दिला.

मोदी यांनी सकाळीच ट्वीटद्वारे रक्षाबंधनानिमित्त देशाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले की 'आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या पावन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.' यानिमित्त यंदा मोदी यांनी पंतप्रदान कार्यालय व निवासस्थानी काम करणाऱया कर्मचाऱयांच्या मुलींकडून राख्या बांधून घेतल्या. पीएमओ व पंतप्रधान निवासस्थानी काम करणारे वाहनचालक, सफाई कर्मचारी, मदतनीस, बागकाम करणारे आदी कर्मचाऱयांच्या मुलींनी पंतप्रधानांना राख्या बांधल्या. राखी बांधण्यास येणाऱया प्रत्येक मुलीचे नाव पंतप्रधान विचारत होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला व या मुलींसमवेत तिरंगा फडकावला. या मुलींनाही त्यांनी भेट म्हणून प्रत्येकी एक तिरंगाच दिला.

ही छायाचित्रे ट्विट करून मोदी यांनी म्हटले की यंदाचे रक्षाबंधन माझ्यासाठी खास ठरले. याचा व्हिडीओही पीएमओने ट्विट केला.

भावनाताई या....!

दरम्यान शिवसेनेतील शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली. सकाळी ११ च्या सुमारास त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. पंतप्रधानांनी, ‘भावनाताई या‘असे म्हणून गवळी यांचे स्वागत केले. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबीय व यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील विकासकामांचीही त्यांनी चौकशी केली. गवळी यांच्या आईंची तब्येत बरी नसते. पंतप्रधानांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. दरम्यान गवळी यांना ईडीने नोटीस बजावली असून, गेली अडीच वर्षे त्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांना राखी बांधतानाचे छायाचित्र सोशल मिडीयावर टाकताच त्यांना ट्रोलर्सनी घेरले. ‘ईडी असे अनेक नातेसंबंध बनवण्यास भाग पाडते,‘ असे एकाने तर ‘ताईसाहेब ईडीच्या शुभेच्छा', असा टोला दुसऱया नेटकऱयाने मारला आहे. गवळी यांनी यावर सकाळला सांगितले की', कोणाला काय बोलायचे ते बोलू द्या. मी २०१८ पासून मोदीजींना राखी बांधत आहे. कोरोनामुळे गेली २ वर्षे मी दिल्लीत येऊ शकले नाही व यावर्षी दिल्लीत होते. त्यामुळे मी पंतप्रधानांना राखी बांधली.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com