पंतप्रधानांना काँग्रेसचा टोमणा; म्हणाले, महागाईच्या बाबतीत मोदी धर्मनिरपेक्ष

Randeep Surjewala and Narendra Modi
Randeep Surjewala and Narendra ModiRandeep Surjewala and Narendra Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे महागाईच्या बाबतीत धर्मनिरपेक्ष (Secular) आहेत. कारण, ते कोणाशीही भेदभाव करीत नाहीत. १ एप्रिलपासून वाढलेल्या महागाईमुळे जनतेवर १,२५,४०७ कोटींचा अतिरिक्त बोजा पडला आहे, असे काँग्रेस (Congress) पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवरून काँग्रेसने शनिवारी (ता. २) पंतप्रधानांना फटकारले.

महागाई ही आता देशात घटना बनली आहे. महागड्या मोदीवादाने देश पिडला आहे. भाजपचा निवडणूक विजय म्हणजे ‘लुटीचा परवाना’ ठरला आहे. देशातील ६२ कोटी अन्नदात्यांवर कराचा बोजा टाकण्यात आला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा बदला घेत आहे. डीएपी खताच्या प्रति बॅग दरात १५० रुपयांनी वाढ केली आहे, असे पत्रकारांशी संवाद साधताना रणदीप सुरजेवाल म्हणाले.

Randeep Surjewala and Narendra Modi
ईडीच्या कारवाईविरोधात नवाब मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस ‘गुड मॉर्निंग गिफ्ट’ देतात. १२ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ७.२० रुपयांनी वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरात अनेकवेळा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत वाढ करून सुमारे एक लाख कोटींची कमाई होत असल्याचा दावा रणदीप सुरजेवाल यांनी केला.

घर आणि कार घेणेही अवघड केले

१ एप्रिलपासून जवळपास ८०० अत्यावश्यक औषधांच्या किमती १०.७ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. एका अंदाजानुसार औषधांच्या किमती वाढल्यामुळे लोकांना दहा हजार कोटी अतिरिक्त मोजावे लागतील. मोदी सरकारने (Narendra Modi) लोकांना घर आणि कार घेणेही अवघड केले आहे. भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदर कमी करून सर्वसामान्यांचे नुकसान केले आहे, असेही रणदीप सुरजेवाल म्हणाले.

भाजपला ही गोष्ट चांगली समजली

मोदीजी (Narendra Modi) महागाईच्या बाबतीत धर्मनिरपेक्ष (Secular) आहेत. ते हिंदू आणि मुस्लिम असा भेद करीत नाही. त्यांना महागाईत धर्म आणि जात दिसत नाही. धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणे, सत्ता मिळवणे आणि काही उद्योगपतींच्या खिशात पैसा टाकणे ही एक गोष्ट भाजपला समजली आहे, असेही रणदीप सुरजेवाल म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com