esakal | नरेंद्र मोदी निघाले परदेश दौऱयावर...
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदींचा परदेश दौऱा चर्चेचा विषय ठरला होता. परदेश दौऱयावरून विरोधकांनी टीकाही केली होती.

नरेंद्र मोदी निघाले परदेश दौऱयावर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीत घवघवीस यश मिळवले असून, नरेंद्र मोदी 30 मे रोजी दुसऱयांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. शपथविधी होण्यापूर्वीच मोदींचे परदेश दौऱयांचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे.

मोदी शपथविधीनंतर सर्वप्रथम शांघाय सहकार संघठनेच्या किर्गीस्तान येथे होणाऱ्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. 14 ते 15 जूनदरम्यान होणाऱया बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही उपस्थित राहणार आहेत. 28-29 जून दरम्यान नरेंद्र मोदी जपानमधील ओसाका येथे होणाऱ्या जी20 शिखर परिषदेला हजर राहणार आहेत. या परिषदेला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासह जगभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

2014 साली पंतप्रधान मोदींनी भुतानपासून परदेश दोऱ्यांना सुरुवात केली होती. त्याचप्रमाणे मोदी यावर्षीही शेजारी प्रथम या तत्वानुसार शेजारच्या देशाला सर्वप्रथम भेट देतील, अशी चर्चा आहे. जी20 परिषदेनंतर मोदी चीनच्या राष्ट्रपतींना भेटणार आहेत. ही अनौपचारिक भेट असेल. जूलै किंवा ऑगस्टमध्ये या भेटीचे आयोजन केले जाईल.

फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्यूल मँक्रो यांनी मोदींना फ्रान्समध्ये होणाऱ्या शिखर संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. या संमेलनासाठी ऑगस्टमध्ये मोदी फ्रान्सला जाणार आहेत. फ्रान्सनंतर मोदी रशियात जाणार आहेत. रशियामध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॅदीमिर पुतीन यांनी मोदींना वलादिवोस्टकमध्ये होणाऱ्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये मोदी रशियाला जातील. त्यानंतर मोदी बँकॉकमध्ये होणाऱ्या ईस्ट-एशिया समिट आणि ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार आहेत. ईस्ट-एशिया समिट 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे.  ब्रिक्स परिषद 11 ते 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान मोदींचा परदेश दौऱा चर्चेचा विषय ठरला होता. परदेश दौऱयावरून विरोधकांनी टीकाही केली होती.

loading image
go to top