esakal | मोदींनी १०० नंबरवर फोन करावा - अखिलेश
sakal

बोलून बातमी शोधा

Akhilesh Yadav

मोदींनी १०० नंबरवर फोन करावा - अखिलेश

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीची स्थिती गृह मंत्रालय आणि इतर केंद्रीय संस्थांकडून तपासावी किंवा १०० नंबरवर फोन करावा, असे आव्हान समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केले.

मोदी यांच्या कार्यक्रमानंतर अखिलेश यांनी एक पत्रकार परिषदच घेतली. मोदी यांनी राष्ट्रीय गुन्हे नोंदणी संस्थेचा (एनसीआरबी) अहवाल बघावा किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने कोणत्या राज्याला सर्वाधिक नोटिसा बजावल्या आहेत हे तपासावे, असेही ते म्हणाले. विद्यापीठ उभारले जाणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांचा पक्ष खोटे बोलण्याचे सर्वोत्तम प्रशिक्षण केंद्र चालवतो, अशी टिप्पणी त्यांनी केली.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता; १७ सप्टेंबरला बैठक

विरोधी नेत्यांकडे दूरदृष्टी नाही असा दावा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांनी आपले डोळे तपासावेत असा टोला त्यांनी लगावला.योगी सरकार कायद्यानुसार चालत नसल्याचा दावा करून ते म्हणाले की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या लोकांची यादी आपला पक्ष तयार करीत आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांची गय केली जाणार नाही.

बुलडोझर बनवा निवडणूक चिन्ह

अयोध्येत काही रहिवाशांची घरे पाडण्यात आल्याचा आरोप करून अखिलेश यांनी भाजपने निवडणूक चिन्ह म्हणून बुलडोझरची निवड करावी अशी खोचक टिप्पणी केली.

loading image
go to top