Modi Oath Ceremony 2024 : विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपची खेळी! केंद्रीय मंत्रिमंडळात साधला राज्यांचा समतोल

Narendra Modi swearing in ceremony : पंतप्रधान मोदी यांना अनेक तडजोडी कराव्या लागतील, असे बोलले जात होते, परंतु मंत्रिमंडळाची रचना पाहताना पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव कायम राहील, हे स्पष्ट झाले आहे.
Narendra Modi swearing in ceremony  balance of states in PM Narendra Modi  NDA cabinet over upcoming assembly elections
Narendra Modi swearing in ceremony balance of states in PM Narendra Modi NDA cabinet over upcoming assembly elections

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) मंत्रिमंडळात राज्यांचा समतोल राखण्यात आला असून आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याचे दिसून येत आहे. मोदी पर्वातील तिसऱ्या मंत्रिमंडळात पूर्वीच्या सरकारप्रमाणे मोदींचा प्रभाव दिसत नसला तरी आघाडी सरकारमध्ये घटक पक्षांच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळण्याची शक्यता नाही. पंतप्रधान मोदी यांना अनेक तडजोडी कराव्या लागतील, असे बोलले जात होते, परंतु मंत्रिमंडळाची रचना पाहताना पंतप्रधान मोदी यांचा प्रभाव कायम राहील, हे स्पष्ट झाले आहे.

Narendra Modi swearing in ceremony  balance of states in PM Narendra Modi  NDA cabinet over upcoming assembly elections
Narendra Modi Oath Ceremony: मोदी 3.0 मध्ये कोण बनले कॅबिनेट मंत्री, कोणाला मिळाले राज्यमंत्रिपद, पहा यादी

देशातील प्रमुख राज्यांना बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळाले आहे. उत्तर प्रदेश व बिहारमधील प्रत्येकी आठ खासदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपला मोठे नुकसान सहन करावे लागले तरी या प्रदेशाला या मंत्रिमंडळात आठ जागा मिळाल्या आहेत. बिहारमध्ये भाजपला स्थान कमी असले तरी संयुक्त जनता दल (जेडीयू), लोक जनशक्ती पक्ष (लोजप) आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या पक्षांच्या सदस्यांची संख्या एकत्रित केली तर बिहारलाही आठ मंत्रिपदे मिळाली आहेत. या मंत्रिमंडळात जवळपास सर्व मोठ्या राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे. ईशान्येकडील सर्वच्या सर्व राज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नसले तरी, या भागातील आसाम, अरुणाचल प्रदेशाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.

Narendra Modi swearing in ceremony  balance of states in PM Narendra Modi  NDA cabinet over upcoming assembly elections
PM Modi Govt : मोदींच्या तिसऱ्या राजवटीत फारसे धोरणात्मक बदल नाही; फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाचा अंदाज

विधानसभा निवडणुकांवर लक्ष


महाराष्ट्राला गेल्या मंत्रिमंडळात आठ मंत्रिपदे होती. यावेळी मात्र महाराष्ट्राला सहा मंत्रिपदे मिळाली आहेत. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र, हरियाना, झारखंड आणि दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या राज्यांनासुद्धा बऱ्यापैकी स्थान मिळाले आहे. महाराष्ट्राला सहा मंत्रिपदे देताना मराठा-दलित जातीय समीकरणे लक्षात घेतली आहेत. महाराष्ट्रासोबत हरियानामध्येही भाजपला जोरदार फटका बसला आहे. या राज्याला दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. यात माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राव इंदरजित सिंह यांना स्थान देण्यात आले आहे. झारखंडमध्येसुद्धा या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. या राज्यातील संजय सेठ, चंद्रशेखर चौधरी व अन्नपूर्णा देवी यांना संधी मिळाली आहे. दिल्लीत पुढील वर्षी फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पूर्व दिल्लीचे खासदार हर्ष मल्होत्रा यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला स्थान नाही


भाजप प्रणीत सरकारमध्ये मुस्लिम समाजाला कमी स्थान मिळत आले. मुख्तार अब्बास नक्वी यांच्यानंतर भाजपच्या मंत्रिमंडळात मुस्लिम समाजातील एकालाही स्थान मिळू शकले नाही. यावेळीही सरकारच्या मंत्रिमंडळात एकाही मुस्लिम मंत्र्याला स्थान मिळाले नाही. तसेच ख्रिश्चन समाजातील सदस्यालाही या मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही. शिख समाजातील रवनीत सिंग बिट्टू आणि हरदीप सिंग पुरी यांना मात्र मंत्रिपद मिळाले आहे. पंजाबमधील लुधियाना मतदारसंघातून बिट्टू यांचा पराभव झाला असला तरी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com