PM Modi Speech in Lok Sabha : "विरोधकांनी ईडीचे आभार मानावे, कारण..." ; नरेंद्र मोदींचे लोकसभेत तुफान भाषण

PM Modi Speech in Lok Sabha
PM Modi Speech in Lok Sabha

PM Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चेला आज लोकसभेत उत्तर दिले आहे. यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला. आधीच हिंडेनबर्ग अदानी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. या सर्वांना नरेंद्र मोदी यांनी जोरदार उत्तर दिले आहे. काही लोकांच्या भाषणातून त्यांची योग्यता समजते, असा टोला नरेंद्र मोदी यांना राहुल गांधी यांना लगावला आहे. 

नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही नऊ वर्षांचा काळ पाहिला आहे. पण आज विरोधक एकत्र आले. मिले-तेरा मेरा सूर, अशी परिस्थिती विरोधकांची आहे. पण या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे कारण ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले आहे. देशातील निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत ते ईडीने केले.

PM Modi Speech in Lok Sabha
Shiv Sena : शिवसेनेत कोणती निवडणूक झालीच नाही; शिंदे गटाच्या खासदाराचा मोठा दावा

भारत एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून विकसित होत आहे. जगात भारताच्या समृद्धीत भरभराट दिसत आहे. निराशेच्या गर्तेत बुडलेल्या काही लोकांना या देशाची प्रगती मान्य नाही. १४० कोटी देशवासीयांचे कष्ट आणि परिश्रम त्यांना दिसत नाहीत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे. 

२ जी आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरुन नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यानंतर विरोधकांनी सभागृहाचा त्याग केला.

PM Modi Speech in Lok Sabha
Cow Hug Day : 14 फेब्रुवारीला 'काऊ हग डे' साजरा करा'; केंद्राचे देशवासियांना आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com