esakal | पंतप्रधान मोदींना आणखी एक मानाचा पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi

पंतप्रधान मोदींना आणखी एक मानाचा पुरस्कार

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी मोहिम असलेल्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल त्यांना अमेरिकेतील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांनी ट्विट करत मोदींना मिळालेल्या पुरस्काराची माहिती दिली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आणखी एक पुरस्कार, प्रत्येक भारतीयाला आज अभिमानाचा क्षण आहे, की पंतप्रधान मोदींना त्यांच्या मेहनती आणि प्रगत विचाराबद्दल जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. मोदींना अमेरिका दौऱ्यावेळी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

यापूर्वी सहा मुस्लिम देशांकडून आणि रशियाकडून पंतप्रधान मोदींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. 

मोदींना मिळालेले पुरस्कार :
पुरस्कार : किंग हमाद ऑर्डर ऑफ रीनेसंस
पुरस्काराचे वैशिष्ट्य : बहरीनमधील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार

पुरस्कार : ऑर्डर ऑफ द डिस्टिंगाइश्ड रूल ऑफ इज्जुद्दीन 
पुरस्काराचे वैशिष्ट्य : परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार

पुरस्कार : ऑर्डर ऑफ सेंट ऐंड्रू
पुरस्काराचे वैशिष्ट्य : रशियातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार

पुरस्कार : ऑर्डर ऑफ जायेद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : संयुक्त अरब अमीरातमधील सर्वोच्च नागरि पुरस्कार

पुरस्कार : ग्रैंड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ फिलिस्तीन
पुरस्काराचे वैशिष्ट्य : ईस्त्राईलतर्फे इतर देशांच्या प्रमुखांना देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

पुरस्कार : स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्लाह खान
पुरस्काराचे वैशिष्ट्य : अफगाणिस्तानकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

पुरस्कार : ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सऊद
पुरस्काराचे वैशिष्ट्य : मुस्लिम नसलेल्या व्यक्तीला सौदी अरेबियाकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरि पुरस्कार

loading image
go to top