esakal | ...तर मोदी, योगींना हटवा; दिग्विजय यांचे भागवतांना आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Digvijay Singh

...तर मोदी, योगींना हटवा; दिग्विजय यांचे भागवतांना आव्हान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) हे आपल्या शब्दाला जागणारे असतील तर निरपराध मुस्लिमांचा छळ केलेल्या सर्व भाजप नेत्यांना (BJP Leader) पदावरून काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्याच पाहिजेत आणि याची सुरवात मोदी, शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यापासून झाली पाहिजे, असे खुले आव्हान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijay Singh) यांनी दिले आहे. (Narendra Modi Yogi Adityanath Mohan Bhagwat Digvijay Singh Politics)

भागवत यांनी रविवारी गाझियाबादमधील एका कार्यक्रमात सर्व भारतीयांचा डीएनए समान असल्याचे भाष्य केले होते. त्यावर दिग्विजय यांनी वरील प्रतिक्रिया करून दिग्विजय यांनी, भागवत असा आदेश देणार नाही, कारण त्यांच्या शब्द आणि कृतीत फरक असतो, अशी टीकाही केली. तुमचे शिष्य, प्रचारक, विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते यांना तुम्ही हे विचार पटवून देणार का, मोदी-शहाजी आणि भाजप मुख्यमंत्री यांनाही ही शिकवण देणार का, असे सवालही दिग्विजय यांनी उपस्थित केले आहेत.

भारतीय असण्याला महत्त्व द्यावे या विधानाबाबत दिग्विजय म्हणाले की, हे सुद्धा आधी तुमच्या शिष्यांना समजावून सांगा. कारण मला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला त्यांनी अनेक वेळा दिला आहे.

हेही वाचा: सुप्रीम कोर्टालाच आश्चर्याचा धक्का; रद्द कायद्यान्वये दाखल होतायत हजारो गुन्हे

गुमराही गँगचा अपप्रचार : नक्वी

स रसंघचालक मोहन भागवत यांनी सामाजिक सद्भाव व मॉब लिंचिंगबाबत जे विचार मांडले त्यावरून त्यांच्यासह भाजपवर टीका करणाऱ्या नेत्यांना प्रत्युत्तर देताना भाजपने ‘गुमराही गँग'' असा शब्द वापरला आहे. अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, ‘भागवत यांनी संघपरिवाराचे विचारच मांडले आहेत. मात्र समाजाची दिशाभूल करून तेढ व भांडणे लावणाऱ्या विरोधी नेत्यांच्या टोळीने पुन्हा अपप्रचार सुरू केला आहे.‘

संघाची सकारात्मक प्रतिमा भागवत यांच्या भाषणाने उजळली असल्याचे पाहून विरोधकांची टोळी चवताळली आहे, अशा शब्दांत नक्वी यांनी एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे दिग्विजयसिंह, आदी नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

ते म्हणाले की, मागील काही वर्षांपासून संघविचारांशी नवनवीन देशबांधव जोडले जात आहेत व या गुमराही गॅंगला त्याचा तिटकारा वाटतो. भागवत यांच्या भाषणामुळे समाजातील संभ्रमाच्या परिस्थितीत स्पष्टतेचा रस्ता स्पष्ट होत आहे. संघाचे विचार कायम असेच सकारात्मक राहिले आहेत. सद्भाव, बंधुत्व व राष्ट्रवाद ही संघाची त्रिसूत्री आहे. मात्र आता अपप्रचाराचा परिणाम होत नसल्याने विरोधी नेत्यांची टोळी चवताळली आहे.

loading image