‘नरेंद्र मोदींनी आता राष्ट्रपती अन् योगींनी पंतप्रधान व्हावे’| Rakesh Tikait | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh Tikait

‘नरेंद्र मोदींनी आता राष्ट्रपती अन् योगींनी पंतप्रधान व्हावे’

एक वर्षाहून अधिक काळ कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा (Farmers movement) सर्वांत मोठा चेहरा असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांची उत्तर प्रदेश निवडणुकीत काय भूमिका आहे? भाजपला विरोध करताना विशिष्ट पक्षाला पाठिंबा देणार का? उत्तर प्रदेश निवडणुकांबाबत हा मोठा प्रश्न राहिला आहे. मात्र, राकेश टिकैत (rakesh tikait) स्पष्टपणे काहीही बोलणे टाळत आहे. एका टीव्ही मुलाखतीत जनता भाजपला मतदान करणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी ते म्हणाले की नरेंद्र मोदी (Narendra Modi) आता राष्ट्रपती होतील आणि योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी पंतप्रधान व्हावे.

भाजप जनतेच्या मताने जिंकणार नाही. मात्र, गडबड करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. भाजपला कोणीही मतदान करणार नाही. ते बेईमान करतील. निवडणूक लढवणाऱ्यांनी सावधानी बाळगावी. तीन-तीन वकील तयार ठेवावे, असे राकेश टिकैत (rakesh tikait) म्हणाले. फॉर्म भरले की ते गडबड करतील, हेराफेरी करून जिंकण्याचा प्रयत्न करतील. जनतेच्या मताने ते जिंकणार नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: प्रेमप्रकरण आले अंगलट; अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

राकेश टिकैत (rakesh tikait) यांनी उसाच्या भाववाढीबाबत योगी (Yogi Adityanath) सरकार तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगताना मायावती पहिल्या तर अखिलेश दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. योगी पुन्हा मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न विचारला असता? टिकैत म्हणाले, ‘अहो, त्यांना पंतप्रधान होऊ द्या, त्यांना राज्यात कशाला अडकवायचे, त्यांनी पंतप्रधान व्हावे. त्यांना मोदीकडे (Narendra Modi) जायचे आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top