प्रेमप्रकरण आले अंगलट; अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रितिकच्या प्रेमात तरुणी एवढी बुडाली की त्याने केलेली प्रत्येक मागणी पूर्ण करीत होती
 crime
crimeesakal

नागपूर : स्नॅपचॅटवर (Snapchat) ओळखी झाल्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने प्रेयसीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर आणि नातेवाइकांच्या व्हॉट्सॲपवर व्हायरल (Bad photos go viral on social media) केले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी पीडितेच्या नातेवाइकांनी केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. रितिक मिश्रा (रा. ओडिसा) असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील आयडीनुसार रितिक मिश्रा हा ओडिसा येथील रहिवासी आहे. १७ वर्षीय मुलगी ही बारावीची विद्यार्थिनी आहे. ऑगस्ट महिन्यात तिची स्नॅपचॅटवर (Snapchat) रितिकशी ओळख झाली. रितिकने तिला ओडीसा येथील कॉल सेंटरमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. स्नॅपचॅटवर दोघांची चॅटिंग होऊ लागली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

 crime
माँ जिजाऊंच्या राजवाड्यासमोर उभारला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

रितिकच्या प्रेमात तरुणी एवढी बुडाली की त्याने केलेली प्रत्येक मागणी ती पूर्ण करीत होती. रितीकने तिला बाथरूममधील फोटो टाकण्यास सांगितले. तिने लगेच तसे फोटो त्याला पाठवले. त्याने अनेकदा तिला अर्धनग्नावस्थेत फोटो मागितले. तरुणीने त्याच्यावर विश्‍वास ठेवून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ (Bad photos go viral on social media) पाठवले.

नोव्हेंबर महिन्यात ती अभ्यासामुळे रितिकशी दुरावा करीत बोलने बंद केली. यामुळे रितिक नाराज झाला. त्याने चॅटिंग करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. तो तिला बोलली नाहीतर अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. मात्र, पीडितेने याकडे दुर्लक्ष केले.

 crime
राजस्थानमध्ये मुख्यमंत्र्यांनी वाढवले निर्बंध; कोरोना नियमांमध्ये बदल

संतापलेल्या रितिकने पीडितेचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरले केले तसेच तिच्या काही नातेवाईकांनाही आणि भावाला पाठविले. भावाने विचारपूस केली असता प्रकार समोर आला. त्यानंतर घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी रितिकविरुद्ध विनयभंग, पोक्सो ॲक्ट आणि आयटी ॲक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com