काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...

काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...

नवी दिल्ली - देवी कालीवरील पोस्टरवरून वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठे विधान केले आहे. माँ काली हे संपूर्ण भारताच्या भक्तीचं केंद्र आहे. त्यांचे आशीर्वाद देशावर राहोत, असं मोदी म्हणाले. देशात माँ कालीच्या पोस्टरवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. (Narendra Modi statement on Maa Kaali)

काली पोस्टर वाद सुरू असताना पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया; म्हणाले काली माँ...
KAALI Controversy: 'काली मां 'Queer',दिग्दर्शिकेचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट

स्वामी आत्मस्थानंद यांच्या जयंती कार्यक्रमाला पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते. याऴेली त्यांनी बेलूर मठाचा उल्लेख केला. म्हणाला- जेव्हा मला तिकडे जायचं असेल तेंव्हा गंगेच्या काठावर वसलेले माँ कालीचे मंदिर दुरूनच दिसत होते. त्यामुळे मला एकप्रकारे माँ कालीच्या भक्तीचा लळा लागला.

पंतप्रधान मोदींच्या काली माँ संदर्भाती वक्तव्यानंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनी ट्विट करत ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी माँ कालीबद्दल भक्तिभावाने बोलले. ती केवळ बंगालसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. दुसरीकडे, टीएमसी खासदाराने माँ कालीचा अपमान केला आणि त्या खासदारावर कारवाई करण्याऐवजी ममता बॅनर्जी माँ कालीबद्दलच्या निंदनीय विधानाचा बचाव करतात.

दिग्दर्शक लीना मणिमेकलाई यांनी काही दिवसांपूर्वी तिच्या काली या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले होते. यामध्ये काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. हे पोस्टर समोर आल्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात वाद झाला होता. त्यानंतर मणिमेकलाई यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये शिव आणि पार्वती देखील सिगारेट ओढताना दाखवले होते. मात्र, हे चित्र त्यांच्या चित्रपटाशी जोडलेले नव्हते. मणिमेकलाई यांच्यावर अनेक राज्यांत गुन्हे दाखल आहेत.

या वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उडी घेतली होती. महुआ यांनी म्हटलं होतं की, सर्वांसाठी धर्मस्वातंत्र्य असायला हवे. तारा पीठात माँ कालीला मद्य अर्पण केले जाते. माझ्यासाठी, काली मांसाहार करणारी, वाइन स्वीकारणारी देवी आहे. महुआ यांच्या या वक्तव्यावरून देखील गदारोळ झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com