National Education Day: देशभक्त मौलाना आझाद यांच्याबद्दल माहिती नसलेले 10 फॅक्टस... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Education Day

National Education Day: देशभक्त मौलाना आझाद यांच्याबद्दल माहिती नसलेले 10 फॅक्टस...

National Education Day 2022: भारतात दरवर्षी 11नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन  म्हणून साजरा केला जातो. देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) यांचा 11 नोव्हेंबर हा जयंती दिन आहे. 11 नोव्हेंबर 2008 पासून हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय तत्कालीन केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता. आजच्या लेखात आपण देशभक्त मौलाना आझाद यांच्या विषयीचे काही फॅक्टस जाणुन घेणार आहोत.

1) मौलाना आझाद यांचे पूर्ण नाव हे मौलाना सैयद अबुल कलाम गुलाम मुहियुद्दीन अहमद बिन खैरुद्दीन अल-हुसैन असे होते.

2) मौलाना आझाद यांना 'आझाद' या नावाने ओळखले जात होते. कारण अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. 

3) मौलाना आझाद यांनी लहानपणीच उर्दू भाषेत शायरी लिहायला सुरूवात केली आणि पुढे त्यांनी धर्म व दर्शन या विषयावर पुस्तके सुध्दा लिहलेले आहेत.

4) लोकजागृतीसाठी 1912 साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. 

5) मौलाना आझाद हे गांधीजी सोबत असहकाराच्या चळवळीत देखील सामील झाले होते.

हेही वाचा: Education Day : मौलाना आझाद यांच्या वाढदिवशी शिक्षण दिवस का साजरा केला जातो ?

6) 1923 मध्ये मौलाना आझाद हे वयाच्या 35 वर्षी दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे सर्वात तरुण अध्यक्ष झाले होते.

7) पुढे स्वातंत्र्यानंतर मौलाना आझाद हे केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले.

8) मौलाना आझाद यांनी शिक्षण मंत्री असताना आयआयटी, साहित्य अकादमी, संगीत अकादमी, बहुउद्देशीय शाळा याबरोबरच समुद्रशास्र यांसारखे आधुनिक शाखांचे शिक्षण देण्यासाठी संस्थांची उभारणी केली.

9) भारत पाकिस्तान फाळणीला कडाडून विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये मौलाना आझादांच नाव प्रथम येतं. 

10) मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल घेत यांना 1992 साली मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार दिला गेला.