National Flag:'हर घर तिरंगा'च्या प्रचारासाठी खासदार काढणार बाईक रॅली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Flag

National Flag: 'हर घर तिरंगा'च्या प्रचारासाठी खासदार काढणार बाईक रॅली

हर घर तिरंगा कार्यक्रमाच्या प्रचारासाठी खासदारांची मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. 3 ऑगस्ट रोजी लाल किल्ला ते विजय चौक अशी ही रॅली काढण्यात येणार आहे. भाजपच्या सर्व खासदारांना रॅलीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. सकाळी 8.30 वाजता उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवतील.

13-15 ऑगस्टपर्यंत देशात प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. या काळात वीस कोटींच्या घरात तिरंगा फडकवला जाईल, असे नियोजन आहे.

हेही वाचा: National Flag: PM मोदींनी डीपीला लावला तिरंगा; जनतेलाही केलं आवाहन

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी लोकांना आवाहन केले की, त्यांनी 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून तिरंगा ठेवण्यासाठी सर्वांना प्रेरित करावे. त्याचबरोबर त्यांनी 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन केले आहे.

हेही वाचा: दिवसा- रात्री देखील तिरंगा फडकवता येणार; केंद्राकडून ध्वज संहितेमध्ये बदल

Web Title: National Flag Mp Will Take Out Bike Rally To Promote Har Ghar Triranga

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..