आम्ही दोघी बहिणी "देशाच्या' 

समृद्धी धायगुडे
मंगळवार, 24 जानेवारी 2017

राष्ट्रीय बालिका दिन 

भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानता कायम राखण्यासाठी देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. अजूनही भारतीय समाजात मुलींना म्हणावे तसे स्थान, स्वातंत्र्य दिले जात नाही. अविकसित गावांमध्ये तसेच काही प्रमुख शहरांमध्येही आज स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, अत्याचारांचे प्रमाण येथे न मांडलेलेच बरे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सरकार प्रयत्नशील आहेच,मात्र भारतात बॉलिवूड, कला, क्रिडा, दिग्दर्शन,राजकारण,शेती अशा विविध क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या काही भगिनींच्या कार्याची बालिका दिनानिमित्त थोडक्‍यात माहिती.. 

राष्ट्रीय बालिका दिन 

भारतीय समाजात स्त्री-पुरुष समानता कायम राखण्यासाठी देशात राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. अजूनही भारतीय समाजात मुलींना म्हणावे तसे स्थान, स्वातंत्र्य दिले जात नाही. अविकसित गावांमध्ये तसेच काही प्रमुख शहरांमध्येही आज स्त्रीभ्रूण हत्या केली जाते, अत्याचारांचे प्रमाण येथे न मांडलेलेच बरे. या सर्व पार्श्‍वभूमीवर सरकार प्रयत्नशील आहेच,मात्र भारतात बॉलिवूड, कला, क्रिडा, दिग्दर्शन,राजकारण,शेती अशा विविध क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या काही भगिनींच्या कार्याची बालिका दिनानिमित्त थोडक्‍यात माहिती.. 

- फोगट भगिनी : दंगल चित्रपटामुळे हरयाणातील या दोन बहिणींचा प्रवास जगासमोर आला. हरयाणासारख्या राज्यातून जिथे प्रत्येक महिलेला आपल्याला मुलगाच हवा अशीच तीव्र इच्छा असते, तेथे फोगट भगिनी जन्माला आल्या आणि आज त्या आंतराष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करत आहेत. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर सिंग यांच्या मुली मुलांपेक्षा किती तरी पुढे आहेत. मुलासाठी आग्रह धरणाऱ्या प्रत्येक पालकांनी या यशस्वी कुस्तीपटू भगिनींकडे पाहावे. अत्याचाराला बळी पडणाऱ्या भारतातील लाखो मुलींनी फोगट भगिनींकडून किमान एक तरी गोष्ट नक्की शिकावी. गीता, बबिता, प्रियांका, रितू, विनेश, संगीता अशी त्यांची नावे असून या सर्वजणी आणि त्यांचा एक भाऊ हे राष्ट्रीय - आंतराष्ट्रीय स्तरावर खेळणारे कुस्तीपटू आहेत. 

- नूरान सिस्टर्स : गायनाच्या क्षेत्रात अत्यंत खडा आवाज असलेल्या ज्योती आणि सुलताना नूरान यांनी आपल्या वडीलांकडून महणजे उस्ताद गुलशन यांच्याकडून दहा वर्षे सुफी गायनाचे धडे घेतले. बॉलिवूडमधील "हायवे' या चित्रपटातील "पटाका गुड्डी' या गाण्याला लागलेला पहाडी आवाज याच भगिनींचा होता. 

- परिणीती - प्रियांका चोप्रा : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि हॉलिवूडपर्यंत पोहोचलेल्या या भगिनी. प्रियांकाची "क्वांटिको' ही लोकप्रिय हॉलिवूड मालिका सध्या सगळीकडेच चर्चेत आहे तर परिणीती चोप्रा ही उत्तम अभिनयाबरोबरच उच्च शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. परिणीतीला सर्वोत्तम अभिनेत्री म्हणून नॅशनल फिल्म फेअर, फिल्मफेअरसारखे पुरस्काराने ती गौरविली गेली आहे. प्रियांका चोप्रा अभिनयाव्यतिरिक्त गायन, निर्माती तसेच 2000 मध्ये मिस वर्ल्ड हा किताब जिंकणारी तसेच बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती लोकप्रिय आहे. 

- बेला- सावनी शेंडे : मराठी चित्रपट सृष्टीत तसेच बॉलिवूडमध्येही आपले नाव पोहोचविणाऱ्या या दोघी बहिणी. सावनी क्‍लासिकल म्युझिक तर बेला सुगम संगीत गायनासाठी लोकप्रिय आहेत. जोधा-अकबर या बॉलिवूडपटातील "मनमोहना' या ए.आर.रेहमान यांनी संगीत दिलेले गाण्यातील बेलाचे स्वर अजूनही रसिकांच्या मनात भरून राहिले आहे. 

- दीपिका - अनिषा पदुकोण : दीपिका पदुकोण ही एक यशस्वी अभिनेत्री होण्यापूर्वी बॅडमिंटन खेळाडू आहे तर अनिषा गोल्फ पटू म्हणून लोकप्रिय आहे. अनिषा वयाच्या दहाव्या वर्षापासून बास्केट बॉल, गोल्फ, क्रिकेट, बॅडमिंटनसारखे खेळ खेळत होती. त्यानंतर गोल्फ खेळावर अनिषाने आपले लक्ष केंद्रीत केले. अनिषा दीपिकापेक्षा पाच वर्षाने लहान असून दीपिका तिचे चांगली मैत्री असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. दीपिकासुध्दा आज बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून हॉलिवूडच्या प्रेक्षकांनाही तिने वेड लावले आहे. 

- ताशी आणि नॅन्सी मलिक : जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर्वाधिक वेगाने सर करणाऱ्या या भारतीय भगिनी. एव्हरेस्ट सर केले तेव्हा या जुळ्या बहीणीचे वय अवघे 24 होते. ताशी, नॅन्सी यांनी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवापर्यंतची सात खंडातील शिखरे स्किइंग,क्‍लायबिंग करत पार केली आहेत. 

- शिखा - नेहा ओबेरॉय : शिखा आणि नेहा ओबेरॉय या टेबल टेनिस खेळातील सर्वोत्तम कामगिरी केलेल्या बहिणी आहेत. शिखा,नेहा,नमिता,निमिता या चौघीजणी टेनिसपटू असून एकटी शिखा भारताचे नेतृत्व करते. नेहा,नमिता,निमिता या अमेरिकेकडून खेळतात. 

- पूनम महाजन - पंकजा मुंडे -प्रितम मुंडे : महाराष्ट्राच्या राजकारातील या तीन बहीणी. पंकजा-प्रितम या दोघींची पूनम ही सख्खी मामे बहीणी असून तिघींची कामगिरी महाराष्ट्रात दिसते. पंकजा सध्या राज्याची महिला आणि बालविकास खात्याची मंत्री आहे. 
पूनम आणि प्रितम या दोघी खासदार आहेत. 

- शक्ती - मुक्ती - निती मोहन : संगीत अणि नृत्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या या बहिणी. निती आणि मुक्ती यांनी गायन क्षेत्रात आपली कामगिरी केली आहे. आलिया भटवर चित्रित केलेले "इश्‍कवाला लव', अनुष्कावर चित्रित केलेले "जिया-जिया रे' ही बॉलिवूड गाणी लोकप्रिय आहेत. शक्ती मोहन एका डान्स रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांसमोर आली. सध्या ती एका डान्स शोची परीक्षक म्हणून काम पाहते. तीसमार खान, रावडी राठोड,धूम: 3 याचित्रपटात तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली. 

- अमरित आणि रबिंद्रा सिंग -मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या या जुळ्या बहिणी ब्रिटीश आर्टिस्ट आहेत. मॉडर्न आर्टसाठी यांच्या चित्रांना आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. प्रतिकात्मक, सांस्कृतिक, सामाजिक विषयांवरील त्यांची चित्रे जगभरातील आर्ट गॅलरीमध्ये आहेत. कॅनडा, लंडन, दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयात, मुंबई, सॅनफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथील आर्ट गॅलरीमध्ये "सिंग ट्‌विन्स' बहिणींच्या कलेचे अप्रतिम नमुने पाहायला मिळतात. 

- आदिती- अपूर्वा संचेती : "शेतकरी भगिनी' म्हणून या पुणे परिसरात ओळखल्या जातात. पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शक्‍यतो मॅनेजमेंटक्षेत्राकडे मुली वळतात. मात्र, या दोघी चक्क शेतीकडे वळल्या. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षे त्या पुणे परिसरातील सणसवाडीसारख्या भागात शेती करत होत्या. आदिती आणि अपूर्वा संचेती या ट्रॅक बदलून आयुष्य जगणाऱ्या आजच्या शहरी भागातील मुलींना एक आदर्श घालून देणाऱ्या भगिनी आहेत. 
 
 

Web Title: national girl child day

फोटो गॅलरी