राष्ट्रीय तपास संस्थेचे जम्मू-काश्‍मीरमध्ये छापे

जम्मूमधील दोडा आणि भटिंडी या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.
nia
niaSakal
Updated on

जम्मू : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज बंदी घालण्यात आलेल्या ‘जमाते इस्लामी’ या दहशतवादी संघटनेच्या जम्मू-काश्‍मीरमधील विविध ठिकाणांवर छापे घातले. तसेच, या संघटनेच्या म्होरक्यांच्या आणि सदस्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले. ‘एनआयए’ने या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करणाऱ्या सभासदांविरोधात शोधमोहीम देखील हाती घेतली आहे.

जमाते इस्लामी या संघटनेचे सदस्य जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवित असल्याची माहिती ‘एनआयए’ला मिळाली होती. त्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मूमधील दोडा आणि भटिंडी या जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com