esakal | National Mango Day : आंबा भारत अन् पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ, वाचा भारतातील लोकप्रिय आंब्यांच्या जाती
sakal

बोलून बातमी शोधा

Mango

National Mango Day : आंबा भारत अन् पाकिस्तानचे राष्ट्रीय फळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानने भारतावर १९४७ ते १९८१ या कालखंडात चार वेळा आक्रमणे करून युद्धास भाग पाडले. त्यांपैकी दोन युद्धे काश्मीर समस्येवरून, एक भारताची युद्धक्षमता अजमावण्यासाठी व एक बांगलादेशाच्या मुक्तीसाठी झाले. हे जरी खरे असले तरी परंपरागत शत्रू असलेल्या दोन्ही देशाचा आंबा हेच राष्ट्रीय फळ (national fruit of India and Pakistan) आहे, हे विशेष. (national mango day mango is national fruit of both country india and pakistan)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

पाकिस्तानमधून १९७१ साली विभक्त झालेल्या बांगलादेशाचे हे राष्ट्रीय झाड आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्रीय चिन्ह आहे. आंबा हे विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्याचा उगम कुठून झाला याचा अद्यापही शोध लागलेला नाही. परंतु, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियातील जैववैविध्य आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षाच्या जिवाश्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाल्याचे मानण्यात येते. अवीट गोडीच्या या फळाला कोकणचा राजाही म्हटले जाते. दक्षिण आशिया आणि भारताच्या संस्कृतीत आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंबा हे सदाहरित वृक्षाच्या प्राजातीमध्ये गणना केली जाते. भारतात आंब्‍याच्या प्रदेशानुसार अनेक जाती असल्या तरी १२ जाती सर्वांत लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे आंबा आता कच्च्या अथवा पिकलेल्या स्वरूपात बाजारात बारा महिने उपलब्ध असतो.

दुर्मिळ झाला गावरानी आंबा -

गेल्या काही वर्षांत वृक्षतोड आणि जीर्ण होऊन झाडे कोलमडून पडल्याने गावरान आंबे दुर्मिळ झाले आहेत. शेंद्रया, खोबऱ्या, संतऱ्या,तेल्या, शेप्या, खाऊट, तोतापरी अशी सर्वसाधारणतः आंब्यांची नावे असायची. गावरान आंबे पिकविण्यासाठी लगबग असायची. घरात प्रवेश करण्यापूर्वीच पिकविण्यासाठी टाकलेल्या गावरान आंब्याचा सुगंध जिभेला पाणी आणत असे. पाहूणे आल्यावर त्यांच्यासमोर बादलीभर पाणी व टोपलेभर आंबे ठेवल्या जात असे. आता तेही दुर्मिळ झाले आहे.

भारतात आढळणाऱ्या लोकप्रिय जाती -

१. अल्फोन्सो हापूस- रत्नागिरी

२. केशर- गीर-जुनागड( गुजरात)

३. दशेहरी- लखनौ, मलिहाबाद- युपी

४. हिमसागर- मुर्शिदाबाद- प. बंगाल

५. चौसा- उत्तर प्रदेश

६. बदामी- कर्नाटक

७. सफेदा- आंध्र प्रदेश

८.बॅाम्बे ग्रीन- पंजाब

९. लंगडा- वाराणशी- युपी

१०. तोतापूरी- बंगळुरू- कर्नाटक

११. बंगनपल्ली- आंध्रप्रदेश

१२. मुलगोबा(दक्षिणेचा हापूस)- तामिळनाडू

loading image