अवघड गणित क्षणार्धात सोडवणाऱ्या शकुंतला देवी; 'ह्यूमन कॉम्प्युटर' म्हणून होत्या परिचित | National Mathematic Day | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shakuntala devi

National Mathematic Day: अवघड गणित क्षणार्धात सोडवणाऱ्या शकुंतला देवी; 'ह्यूमन कॉम्प्युटर' म्हणून होत्या परिचित

Shakuntala Devi Biography: गणित विषयाची आवड खूप कमी लोकांना असते. अनेकजणांचे मत असते शाळेत शिकलेल्या गणिताचा व्यवाहारिक जीवनात कधी वापरच केला जात नाही. मात्र, अशीही लोकं आहेत ज्यांनी संपूर्ण आयुष्य गणितासाठी वाहिले. यापैकीच एक होत्या शकुंतला देवी. गणितातील त्यांच्या प्राविण्यामुळे त्यांना ह्यूमन कॉम्प्युटर म्हटले जायचे. राष्ट्रीय गणित दिनानिमित्ताने शकुंतला देवी यांच्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

कोण आहेत शकुंतला देवी?

शकुंतला देवी या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ आहेत. त्यांना कॅलक्यूलेशनमुळे ह्यूमन कॉम्प्युटर म्हणून ओळखले जायचे. विशेष म्हणजे ज्यावेळी कॅलक्यूलेटर उफलब्ध नव्हते, कॉम्प्युटरबाबत जास्त कोणाला माहिती नव्हते; अशावेळी शकुंतला देवी यांनी आपल्या कौशल्याने सर्वांना प्रभावित केले होते. त्या कोणत्याही प्रश्नांचे उत्तर अवघ्या काही सेकंदात तोंडी देत असे.

शकुंतला देवी यांचे लहानपण

शकुंतला देवी यांचा जन्म ४ डिसेंबर १९२९ ला बंगळुरू येथे झाला. गरीब कुटुंबात जन्म झालेल्या शकुंतला यांचे लहानपण झोपडपट्टी भागात गेले. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत असे. गरीबी असल्याने त्यांना औपचारिक शिक्षण देखील पूर्ण करता आले नाही. एवढ्या समस्येनंतर देखील त्यांचे प्रतिभेवर कोणताच परिणाम झाला नाही.

हेही वाचा: Corona Virus: कोरोना पुन्हा येतोय! आताच घरी आणा हे मेडिकल गॅजेट्स, ऐनवेळी होईल खूपच उपयोग

त्या ३ वर्षांच्या असल्यापासूनच त्यांच्यातील प्रतिभा दिसू लागली होती. एकदा पत्ते खेळताना वडिलांनी त्यांच्यातील कला ओळखली होती. ६ वर्षांच्या असताना म्हैसुर विद्यापीठ आणि अन्नमलाई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. वर्ष १९४४ मध्ये त्या वडिलांसोबत लंडनला गेल्या. येथूनच पुढे त्यांच्या प्रतिभेला खरी चालना मिळाली. त्यांना अमेरिकेतील विद्यापीठात देखील आमंत्रित करण्यात आले, जेथे अवघ्या मिनिटात उत्तरे देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

गणितासोबतच त्यांना लिखाणाची देखील आवड होती. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि कोडी यांच्याशी संबंधित पुस्तके देखील लिहिली. वर्ष १९७७ मध्ये त्यांना समलैंगितकेतवर आधारित ‘दी वर्ल्ड ऑफ होमोसेक्शुअल’ हे पुस्तक लिहिले होते.

मोठ मोठ्या पुरस्काराने सन्मानित

वर्ष १९६९ मध्ये शकुंतला यांना वुमन ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना रामानुजन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील त्यांचे नाव नमूद आहे. वर्ष २०१३ मध्ये या प्रतिभावान गणितज्ञ महिलेचे निधन झाले. वर्ष २०२० मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट देखील आला होता. या चित्रपटात विद्या बालनने प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा: Nothing Smartphone: ३० हजारांचा Nothing चा स्मार्टफोन मोफत मिळतोय, फक्त करावे लागेल 'हे' काम

टॅग्स :mathematics