National Mathematic Day : आकडेमोड बघून घाम फुटतो ? असू शकतो 'हा' आजार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Mathematic Day

National Mathematics Day : आकडेमोड बघून घाम फुटतो ? असू शकतो 'हा' आजार

Fear of Maths Subject Leading to Anxiety in Children : काही मुलांना गणित आणि विज्ञान हे आवडते विषय असतात. तर बहुतांश लोकांना तुमचा नावडता विषय कोणता असं विचारलं तर गणित हाच विषय सांगितला जातो. त्यामुळे गणिताची भीती का वाटते? हा प्रश्न ओघानेच येतो. जो आता सामान्य झाला आहे.

पण काही मुलांमध्ये ही भीती प्रचंड प्रमाणात असल्याचं जाणवतं. गणित म्हटलं की त्यांच्या तोंडचं पाणी पळतं, घाम फुटतो. काही तर गणिताच्या पेपरच्या वेळीच किंवा विचारानेही आजारी पडतात. असं का होतं, हा गंभीर प्रश्न आहे. त्याला लाईटली घेणं महागात पडू शकतो.

हेही वाचा: National Mathematics Day: सुपर 30 चित्रपटाने मुलांमध्ये निर्माण झाली गणिताची गोडी; त्यात काय होतं खास?

या विषयाबाबत मुलांवर दबाव आणला तर मात्र मुलं डिप्रेशनमध्ये येऊ शकतात. यामुळे त्यांना एका ठराविक वेळेनंतर या विषयाचा राग येऊ शकतो. काही दिवसांपूर्वीच करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, मुलांमध्ये गणिताबाबत वाढत्या भितीमुळे ते 'मॅथ्स एंजायटी'ने ग्रस्त होऊ शकतात.

हेही वाचा: National Mathematic Day: अवघड गणित क्षणार्धात सोडवणाऱ्या शकुंतला देवी; 'ह्यूमन कॉम्प्युटर' म्हणून होत्या परिचित

या सर्वेक्षणानुसार मुलांमधल्या डिप्रेशनचं एक महत्वाचं कारण गणित विषय आहे. संशोधन व्यवस्थित केल्यानंतर संशोधक या निष्कर्षांवर पोहोचले की, प्रायमरी आणि सेकेंडरी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये मुली मॅथ्स एंजायटीने ग्रस्त होत आहेत.

संशोधनामध्ये या गोष्टीचा खुलासा करण्यात आला की, असं होण्यामागील कारण म्हणजे मुलं विषय समजून घेण्याआधीच या विषयाला घाबरण्यास सुरुवात करतात आणि डिप्रेशनमध्ये जातात. याव्यतिरिक्त त्यांना या विषयामध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळेही ते आणखी त्रस्त होतात.

या संशोधनामधून आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांची हा विषय शिकवण्याची पद्धत. या संशोधनातून मुलांनी स्वतः याबाबत तक्रार केली आहे. त्यांच्या शाळेमध्ये हा विषय वेगवेगळ्या पद्धतींनी शिकवला जातो, ज्यामुळे ते नेहमी कन्फ्यूज होतात.

आश्चर्याची बाब म्हणजे जी मुलं गणितामध्ये हुशार असतात. त्यांनाही अनेकबाबतीत तणाव जाणवू लागतो. जी मुलं गणितात हुशार असतात, त्यांच्या पालकांना फक्त मार्कांशी घेणंदेणं असतं. असं केल्यामुळे त्या मुलांमध्ये हळूहळू तणाव दिसू लागतो आणि ती भविष्यामध्ये त्या फिल्डमध्येही परफॉर्म करू शकत नाहीत जिथे ती परफेक्ट असतात.