NRC Update India : राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याबाबत केंद्र सरकारने लोकसभेत स्पष्ट केली भूमिका!

Union Minister Nityanand Rai's Lok Sabha Clarification: जाणून घ्या, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नेमकं काय सांगितलं?
Union Minister of State for Home Affairs, Nityanand Rai, addresses the Lok Sabha and confirms that no decision has been made to update the National Population Register (NRC).
Union Minister of State for Home Affairs, Nityanand Rai, addresses the Lok Sabha and confirms that no decision has been made to update the National Population Register (NRC). esakal
Updated on

National Population Register News :  केंद्र सरकारने आज (मंगळवार) सांगितले की, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) अद्ययावत करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही.  गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की,  केंद्राने १६ जून २०२५ रोजी राजपत्रात जनगणना करण्याचा आपला हेतू सूचित केला आहे.

याशिवाय ते म्हणाले की, जनगणना दोन टप्प्यात केली जाईल - पहिल्या टप्प्यात, घरांची यादी आणि गृहनिर्माण गणना अंतर्गत, प्रत्येक घराची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांचा तपशील गोळा केला जाईल.

तसेच, "यानंतर, दुसऱ्या टप्प्यात, म्हणजेच लोकसंख्या गणना, प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्याशास्त्रीय, सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर तपशील गोळा केले जातील. जनगणनेत जातीय गणना देखील केली जाईल. याचबरोबर जनगणनेसाठी अंदाजे आर्थिक खर्च अंतिम केला जात असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

Union Minister of State for Home Affairs, Nityanand Rai, addresses the Lok Sabha and confirms that no decision has been made to update the National Population Register (NRC).
PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

याशिवाय ते म्हणाले, "राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जनगणना करण्याचा हेतू अधिसूचित करण्यात आला आहे. घरांची यादी आणि गृहसंख्या गणना करण्याचा कालावधी योग्य वेळी सूचित केला जाईल. २०२७ च्या जनगणनेपूर्वी एनपीआर अद्ययावत करण्याचा आपला हेतू सरकारने अधिसूचित केला आहे का, असे मंत्र्यांना विचारण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com