PM Modi Parliament : ‘’ज्यांना भारताची बाजू दिसत नाही त्यांना मी...’’ ; पंतप्रधान मोदींचा लोकसभेत थेट इशारा!

PM Modi Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर वरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना मोदींनी नेमकं काय उत्तर दिलं?
PM Modi
PM Modiesakal
Updated on

PM Modi’s Strong Statement in Lok Sabha on Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(मंगळवार) लोकसभेत बोलताना ऑपरेशन सिंदूरवरून विरोधकांनी केलेलया आरोपांना प्रत्युत्तर दिलं. मोदींनी सुरुवातीलाच सांगितलं,  या सत्राच्या सुरुवातीलाच मी जेव्हा मीडियाशी बोलताना, तेव्हा मी सर्व संसद सदस्यांना आवाहन करत उल्लेख केला होता की मी म्हणालो होतो की हे सत्र भारताच्या विजयोत्सवाचे सत्र आहे.

तसेच संसदेचं हे सत्र भारताच्या गौरवगाणाचं सत्र आहे. जेव्हा मी विजयोत्सवाबाबत बोलत आहे,  तेव्हा मी सांगू इच्छितो की हा विजयोत्सव दहशतवाद्यांच्या मुख्यालयांना मातीत गाडण्याचा आहे. जेव्हा मी विजयोत्सव म्हणतो, तेव्हा हा विजयोत्सव सिंदूरची शपथ पूर्ण करण्याचा आहे. हा भारतीय सैन्याच्या शौर्य आणि सामर्थ्याचा विजयोत्सव आहे. १४० कोटी भारतीयांची एकता, इच्छाशक्तीच्या अप्रतिम विजयाचा हा विजोयत्सव आहे. मी याच विजयी भावनेने या संसदेत भारताची बाजू मांडण्यास उभा आहे आणि ज्यांना भारताची बाजू दिसत नाही, त्यांना मी आरसा दाखवण्यासाठी उभा आहे. मी १४० कोटी भारतीयांच्या भावनेत माझा स्वर मिळवण्यासाठी उभा आहे. असा इशारा मोदींनी दिला.

याशिवाय, ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्याप्रकारे देशाच्या लोकांनी मला साथ दिली. मला आशीर्वाद दिले. देशाच्या जनतेचं माझ्यावर कर्ज आहे. मी देशवासीयांचे आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. २२ एप्रिलला पहलगामध्ये ज्याप्रकारे क्रूर घटना घडली. ज्याप्रकारे दहशतवाद्यांनी निर्दोष लोकांना त्यांचा धर्म, विचारून मारलं. ही क्रूरतेची परकाष्टा होती. भारताला हिंसाचाराच्या आगीत ढकलण्यासाठीचा हा विचारपूर्वक केलेला प्रयत्न होता. भारतात दंगली भडकवण्याचा कट होता. मी आज देशवासीयांना धन्यवाद देतो की, देशाने एकजुटीने ते षडयंत्र अयशस्वी ठरवलं. असंही मोदींनी यावेळी म्हटलं.

PM Modi
Rajnath Singh Rajya Sabha Speech: '..तर आम्ही पाकिस्तानला मदत करण्यास तयार आहोत', राजनाथ यांचं राज्यसभेत मोठं विधान!

याशिवाय, २२ एप्रिल नंतर मी सार्वजनिकरित्या आणि जगाला समजावं म्हणून काही इंग्रजीतही वाक्य बोललो होतो. मी म्हणालो होतो ती आमचा संकल्प आहे आम्ही, दहशतवाद्यांना मातीत गाडू आणि मी हे जाहीरपणे सांगितलं होतं की शिक्षा त्यांच्या आकांना देखील दिली जाईल. कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल. २२ एप्रिलला मी परदेशात होतो मी तत्काळ परत आलो. आल्यानंतर मी तत्काळ एक बैठक बोलावली आणि त्या बैठकीत आम्ही स्पष्टपणे निर्देश दिले, की दहशतवादाला कठोर प्रत्त्युत्तर द्यावं लागेल. हा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे. असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

PM Modi
Owaisi on Ind vs Pak Cricket match: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून आता ओवैसीचा संसदेत मोदींना सवाल, म्हणाले..

याचबरोबर ''आम्हाला आमच्या सैन्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. संपूर्ण विश्वास आहे, त्यांच्या क्षमतेवर, हिंमतीवर, शौर्यावर, सैन्याला कारवाईची पूर्णपणे मोकळीक दिली गेली आणि  हेही सांगितलं गेलं, की सैन्याने ठरवावं कुठे, कधी, कशाप्रकारे... हे सगळं काही त्या बैठकीत ठरवलं गेलं. आम्हाला गर्व आहे की दहशतवाद्यांना अशी शिक्षा दिली गेली, की आजही दहशतवाद्याच्या त्या आकांची झोप उडालेली आहे.'' असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com