नवी दिल्ली: ‘‘मॉन्सूनच्या काळात नैसर्गिक आपत्ती देशाची परीक्षा पाहत आहे. मागील काही काळात आपण पूर, भू-स्खलन यासारख्या मोठ्या आपत्ती पाहिल्या आहेत. कुठे घरे उद्ध्वस्त झाली तर कुठे शेती पाण्याखाली बुडाली. कुटुंबे रस्त्यावर आली आणि पाण्याच्या वेगात रस्ते, पूल वाहून गेले. लोकांचे जीवन संकटात अडकले. अशा घटनांनी देशातील प्रत्येक नागरिक दुःखी झाला आहे,’’ अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणी वरील ‘मन की बात’मध्ये बोलताना व्यक्त केली.