

Nauradehi Tiger Reserve to Become Third Cheetah Home After Kuno and Gandhi Sagar With Tigers and Cheetahs Together
esakal
मध्य प्रदेशातील वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पात ‘प्रोजेक्ट चित्ता’चा विस्तार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ७ ऑक्टोबर रोजी सागर जिल्ह्यातील नौरादेही परिसरात ‘वियोम’ आणि ‘नीरा’ या नर-मादी चित्त्यांना जंगलात मुक्त केले. कूनो राष्ट्रीय उद्यान आणि गांधी सागर अभयारण्य यांच्यानंतर नौरादेही हे मध्य प्रदेशातील चित्त्यांचे तिसरे अधिकृत अधिवास केंद्र ठरले आहे.