कन्हैयासारखा गळा चिरणार; नवीन कुमार जिंदालला ठार मारण्याची धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naveen Kumar Jindal threatens to kill

कन्हैयासारखा गळा चिरणार; नवीन कुमार जिंदालला ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. अशात भाजपचे बहिष्कृत नेते नवीन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनाही कन्हैयालालप्रमाणे ठार मारण्याची धमकी ( threat) देण्यात आली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी स्वतः ट्विट करून या धमकीची माहिती दिली आहे. नवीन कुमार जिंदाल यांनी नूपुर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या टिप्पणीचे समर्थन करीत ट्विट केले आहे. त्यामुळे ते वादातही सापडले आणि भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. (Naveen Kumar Jindal threatens to kill)

नवीन कुमार जिंदाल यांनी ट्विट केले आहे की, आज सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास मला तीन ईमेल आले. त्यांच्यासोबत कन्हैयालालच्या हत्येचे व्हिडिओही जोडण्यात आले होते. मला व माझ्या कुटुंबीयांना अशाच प्रकारे ठार मारण्याच्या धमक्या (threat) देण्यात आल्या आहेत. मी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. पूर्व दिल्लीचे डीसीपी, दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल आणि पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी.

हेही वाचा: जावई आणि सासू पडले एकमेकांच्या प्रेमात; घरातून पळाले अन्...

नवीन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांना मिळालेल्या धमक्यांनी चिंतेत भर टाकली आहे. विशेषत: अशावेळी जेव्हा उदयपूरमध्ये हत्याकांड घडले. नवीन कुमार जिंदाल यांनी त्यांच्या ट्विटसोबत ईमेलचे स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. ‘दहशतवादी नवीन कुमार, आता तुझी पाळी आहे. आम्ही लवकरच तुझा गळा चिरून टाकू’ असे लिहिले आहे.

कुटुंबीयांना दिल्लीबाहेर पाठवले

पक्षातून हकालपट्टी झाल्यापासून नवीन कुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे अनेकदा सांगितले आहे. एवढेच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही दिल्लीबाहेर पाठवले आहे. कन्हैयालालच्या हत्येनंतर उदयपूरसह राजस्थानमध्ये तणावाचे वातावरण आहे. सर्व ३३ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे. उदयपूरमधील अनेक पोलिस ठाण्यांमध्ये संचारबंदी लागू केली आहे.

हेही वाचा: शिंदेंच्या बंडाने घोषणांना उधाण; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन मोठ्या घोषणा

कन्हैयालालच्या हत्येचा पाकिस्तानशी संबंध

उदयपूर घटनेचा तपास गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. कन्हैयालालच्या हत्येचा पाकिस्तानशी (Pakistan) संबंधही समोर आला आहे. ही घटना घडवणाऱ्या दोन आरोपींचे कराचीस्थित सुन्नी इस्लामिक संघटना दावत-ए-इस्लामीशी संबंध असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानस्थित कट्टरपंथी संघटना तहरीक-ए-लब्बैकशीही त्याचे संबंध आहेत. तपासाशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली आहे.

Web Title: Naveen Kumar Jindal Threatens To Kill

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murderThreat
go to top