शिंदेंच्या बंडाने घोषणांना उधाण; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दोन मोठ्या घोषणा

Two big announcement in todays cabinet meeting after Shindes revolt
Two big announcement in todays cabinet meeting after Shindes revoltTwo big announcement in todays cabinet meeting after Shindes revolt

मुंबई : आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्याने सरकार धोक्यात आल्याचे दिसत आहे. ते आपल्या बंडावर कायम असल्याने शासकीय निर्णय घेण्यास अडचण जात आहे. अशात राज्य सरकार दोन दिवसांपूर्वी अनेक कामे मार्गी लावले होते. यानंतर बंडखोर आमदारांचे खाते दुसऱ्या मंत्र्यांना देण्यात आले. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) पोलिस भरती आणि औरंगाबादचे नामांतर अशा मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. (Two big announcement in todays cabinet meeting after Shindes revolt)

बंडखोर आमदार आपल्या बंडावर कायम आहेत. या आमदारांमध्ये ८ मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या विभागाची कामे रखडली आहेत. आपल्या बंडामुळे कामे रखडली आहेत, याचा त्यांना भान नसल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे अशा मंत्र्यांचे खाते काढून कामे मार्गी लावण्यासाठी दिल्याचे ते म्हणाले होते.

Two big announcement in todays cabinet meeting after Shindes revolt
...याचा अर्थ काय? एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न

यादरम्यान अनेक निर्णय घेण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. अनेक कामे मार्गी लावली जात आहे. तसेच निर्णय घेताना कोणतीही अडचण येत असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते.

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी मी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडली आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही (Cabinet Meeting) यावर चर्चा होईल’ असे ट्विट परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केले आहे.

औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. औरंगाबादेत झालेल्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर होणार; परंतु, योग्य वेळ आल्यावर असे म्हटले होते. मी औरंगाबादला संभाजीनगर मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. नाव बदलण्याची गजर काय? ते आहेच संभाजीनगर असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

Two big announcement in todays cabinet meeting after Shindes revolt
Sakal Survey : विखुरलेल्या शिवसैनिकांचा आकडा पक्षाची चिंता वाढवणारा

त्यांच्या या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही कोण आहात, असा प्रश्न करून मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. एकप्रकारे औरंगाबादचे नामांतर करण्याची मागणी केली होती. आता यावर उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात तब्बल ७,२३१ पदांची भरती होणार आहे. या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. दरवर्षी पोलिस भरतीसाठी लाखो तरुण आतुरतेने वाट बघत असतात त्यांच्यासाठी हा मोठा क्षण आहे. याबाबत लवकरच अधिकृत सविस्तर माहिती दिली जाणार. याआधी पहिल्या टप्प्यात ५,२०० पदांची पोलिस भरती झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com