
नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात बनलाय क्लार्क, रोजची कमाई 90 रुपये
माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धुला 1988 च्या रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलीय. पटियाला सेंट्रल जेलमध्ये सिद्धू शिक्षा भोगतोय. नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क म्हणून काम करणार असून त्याची दररोजची कमाई ९० रुपये असणार आहे. (Navjot Singh siddhu will work as clerk)
पटीयाला सेंट्रल जेलमध्ये त्याला जेलमधील रेकॉर्ड तयार करणं, तसंच कोर्टाच्या ऑर्डरचं विश्लेषण करणं असं काम सोपवण्यात आलंय. नवज्योतसिंग सिद्धू क्रिकेटबरोबरच त्याच्या राजकिय करियरसाठी ओळखला जातो, त्याचबरोबर लाफ्टर शो मध्ये त्याची उपस्थिती प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी असायची. आता तुरुंगात नवज्योतसिंग सिद्धू क्लार्कची भूमिका निभावणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूला तीन महिन्यांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. यात तुरुंगातील रेकॉर्ड बनवण्याची ट्रेंनिंग दिली जाणार आहे.
हेही वाचा: जात जनगणनेवरून भाजपचा 'सस्पेन्स' संपुष्टात, सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहणार
त्याचबरोबर एखाद्या आरोपीविषयी कोर्ट जो आदेश देतो. त्या लिखित आदेशाचं विश्लेषण करण्याच ट्रेनिंगही त्यांना देण्यात येणार आहे. तुरुंगातील नियमानुसार पहिले तीन महिने त्याला पगार मिळणार नाहीए. पण नवज्योतसिंग सिद्धू जरी क्लार्क म्हणून काम करणार असला तरी त्याला त्याच्या कोठडीतूनच हे काम करावं लागणार आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धूने मंगळवारपासून काम सुरु केलंय. त्याला दोन शिफ्टमध्ये काम करावं लागणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूला सुप्रीम कोर्टाने एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावला आहे
Web Title: Navjot Singh Siddhu Will Serv In Jail As Cleark On Daily Wages 90 Rs
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..