esakal | कॅप्टन अमरिंदर यांची माफी न मागण्यावर सिद्धू ठाम
sakal

बोलून बातमी शोधा

navjyot singh siddhu

कॅप्टन अमरिंदर यांची माफी न मागण्यावर सिद्धू ठाम

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: पंजाबमध्ये (punjab) सत्ताधारी काँग्रेसने (congress) अंतर्गत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला असला, तरी वाद निवळण्याऐवजी वाढतच चालला आहे. सिद्धू जाहीरपणे माफी मागत नाहीत, तो पर्यंत भेट घेणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांनी घेतली आहे. आता सिद्धू यांनी सुद्धा तशीच ताठर भूमिका घेतल्याचं समोर येत आहे. नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) कॅप्टन अमरिंदर सिंह यांची माफी मागणार नाहीत, असं सिद्धू यांच्या गोटातून सांगितलं जात आहे. (Navjot Singh Sidhu camp says he wont apologise to Punjab CM Amarinder Singh dmp82)

आपल्याबद्दल केलेल्या मानहानीकारक टि्वटस बद्दल सिद्धू माफी मागत नाही, तो पर्यंत त्यांना भेटणार नाही, असे अमरिंदर सिंग यांनी मागच्या आठवड्यात काँग्रेस पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांच्याबरोबरच्या बैठकीत स्पष्ट केलं होतं.

हेही वाचा: ठाणे: "लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?"

पंजाबमधील सरकारच्या हाताळणीच्या विषयावरुन नवज्योत सिंग सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात जी वक्तव्य केली, जे टि्वटस केलेत, त्याबद्दल ते माफी मागणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

अमरिंदर यांचे मीडिया सल्लागार काय म्हणाले?

सिद्धूची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी शुभेच्छा दिलेल्या नाहीत. उलट सिद्धूने माफी मागावी, अशी मागणी करुन हा वाद इतक्यात शमणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवज्योत सिंग सिद्धूने अमरिंदर सिंग यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे वृत्त मुख्यमंत्र्यांचे प्रसारमाध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी फेटाळून लावले.

सिद्धूने कॅप्टन अमरिंदर यांच्या भेटीची वेळ मागितल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. "अमरिंदर यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. सोशल मीडियावरुन सिद्धूने मुख्यमंत्र्यांवर व्यक्तीगत टीका केली होती. त्याबद्दल सिद्धू जाहीरपणे माफी मागत नाहीत, तो पर्यंत ही भेट होणार नाही" असे अमरिंदर यांच्या प्रसारमाध्यम सल्लागाराने स्पष्ट केले.

loading image