esakal | Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'
sakal

बोलून बातमी शोधा

Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा (Raj kundra Pornography case) विषयी नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty husband) पती असलेल्या राज कुंद्राला सोमवारी रात्री मुंबई पोलिसांच्या संपत्ती शाखेने (mumbai police property cell) अटक केली. गुन्हे शाखेला (crime branch) तपासामध्ये राज कुंद्राचे व्हॉट्स अ‍ॅप चॅट सापडले आहेत. त्यामधून त्याचा 'प्लान बी' समोर आला आहे. पॉर्नचा व्यवसाय बंद होऊ नये, तो पुढे सुरु ठेवता यावा, यासाठी राज कुंद्राने 'प्लान बी' तयार करुन ठेवला होता. (Raj kundra arrest in Pornography case new whats app chat reveal he had paln dmp82)

राज कुंद्राने जो व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप बनवला होता, त्याचे चॅटस समोर आले आहेत. 18 नोव्हेंबरला गुगल प्ले च्या नियमानुसार policy violation चं उल्लंघन केल्यामुळे Hotshots हे डिजिटल अ‍ॅपलिकेशन बंद केलं. मात्र मिळालेल्या या चॅटद्वारे या सर्वांनी असं काही झाल्यास (प्लान B) दुसरा पर्याय यापूर्वीच तयार ठेवला होता.

हेही वाचा: ITI प्रशिक्षणाला परवानगी पण लोकल प्रवासाची मुभा नाहीच!

अ‍ॅपलिकेशन बंद केल्यानंतरही राज कुंद्रा हा टेन्शन मध्ये नव्हता, कारण प्लान A फसल्यानंतर त्याने चॅट मध्ये प्लान B सुरू करा असं म्हटलेलं होतं. दोन तीन आठवड्यात नवीन अ‍ॅपलिकेशन IOS Android वर live होऊन जाईल, असा त्यात उल्लेख आहे.

त्याने ज्यांच्यावर Hotshots digital मार्केटिंगची जबाबदारी सोपावली होती. त्याने असे लिहिलं आही की, "जो पर्यंत आपलं नवीन अ‍ॅप येत नाही. तो पर्यंत आपण अश्लील चित्रपट डीएक्टिवेट करू आणि play स्टोरला अ‍ॅपलिकेशन रिस्टोर करण्याची विनंती करू"'

हेही वाचा: सहा महिन्यात किती टक्के मुंबईकर झाले 'बाहुबली'? वाचा सविस्तर

गहना काय म्हणाली ?

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra अश्लील चित्रपट निर्मितीप्रकरणी सोमवारी रात्री अटक झाली. या अटकेवर अभिनेत्री गहना वशिष्ठने Gehana Vasisth प्रतिक्रिया दिली आहे. याचप्रकरणी गहनालासुद्धा अटक करण्यात आली होती. 'झूम' या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "न्यायव्यवस्था या प्रकरणावर योग्य न्याय देईलच. आम्हाला मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे पण त्यांनी पॉर्न व्हिडीओ आणि बोल्ड व्हिडीओ यामध्ये गल्लत करू नये."

loading image