नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात भरती; यकृताची समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu hospitalized because of Liver problems

नवज्योतसिंग सिद्धू रुग्णालयात भरती; यकृताची समस्या

नवी दिल्ली : रोड रेज प्रकरणी पटियाला सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेले काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांची प्रकृती बिघडल्याने सोमवारी (ता. ६) चंदीगडच्या पीजीआयएमईआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यकृताच्या समस्येनंतर (Liver problem) सिद्धू यांना चंदीगडच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च सेंटरमध्ये तपासणीसाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी सिद्धू यांना तपासणीसाठी दाखल केले आहे. (Navjot Singh Sidhu hospitalized because of Liver problems)

१९८८ च्या रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना कोर्टाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धू यांनी २० मे रोजी न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांची रवानगी पटियाला येथील सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी सिद्धू यांना वैद्यकीय तपासणीसाठी पतियाळा येथील राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले होते.

हेही वाचा: ...तरच तुम्ही ठरणार ‘अत्यंत गरीब’; गरिबीची गणना करण्याचे सूत्र बदलले

सिद्धू यांनी अलीकडेच तुरुंगात विशेष आहाराची मागणी केली होती. सिद्धू गहू, साखर, मैदा यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करू शकत नाहीत. सिद्धू जामुन, पपई, पेरू, डबल टोन्ड दूध घेऊ शकतात. सिद्धू फक्त तेच अन्न खाऊ शकतात ज्यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट्स नाहीत, असे नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचे वकील एचपीएस वर्मा यांनी सांगितले होते.

Web Title: Navjot Singh Sidhu Hospitalized Liver Problems

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top