
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली
पंजाब काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sindhu) यांना गुरुवारी (ता. १९) सर्वोच्च न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. ३४ वर्षे जुन्या रोड रेज (Road Rage Case) प्रकरणी सिद्धूला एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी (ता. २०) पटियाला जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. (Navjot Singh Sidhu surrendered in Patiala District Court)
१९८८ च्या या खटल्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धूला आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवड्यांचा वेळ हवा असल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार होते. मात्र, सिद्धूंनी शुक्रवारी दुपारी दिल्लीच्या पटियाला न्यायालयात (Patiala District Court) आत्मसमर्पण केले.
हेही वाचा: पुण्यातील लाल महालात लावणी; रिल्सच शूटिंग
वकिलाने सिद्धू यांना आत्मसमर्पण करण्यासाठी चार ते सहा आठवडे वाढवण्याच्या विनंतीला विरोध केला होता. ३४ वर्षे झाले म्हणजे गुन्हा मरतो असे होत नाही. आता निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा ३ ते ४ आठवड्यांची आवश्यकता आहे. मात्र, वेळ देण्याबाबत विचार करणे हा न्यायालयाचा अधिकार आहे, असे पंजाबच्या वकिलांनी सांगितले. न्यायमूर्ती खानविलकर यांनी सिद्धूच्या वकिलाला अर्ज दाखल करण्यास सांगितले आणि खंडपीठाच्या स्थापनेसाठी सीजेआयसमोर नमूद केले.
मात्र, आत्मसमर्पणाला मुदतवाढ देण्याची चर्चा सुरू होण्यापूर्वीच सिद्धू (Navjot Singh Sindhu) शुक्रवारी पटियाला हाऊस कोर्टात आत्मसमर्पण करणार असल्याची बातमी आली होती. शुक्रवारी सकाळी काँग्रेसचे काही नेते आणि समर्थक नवज्योतसिंग सिद्धू यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. १९८८ च्या रोड रेज (Road Rage Case) प्रकरणात सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा: प्रशांत किशोर म्हणाले, मला चिंतन शिबिरावर भाष्य करण्यास सांगितले जाते
न्यायालयीन कोठडीत घेतले
सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत घेण्यात आले आहे. शरणागती पत्करल्यानंतर आता त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले जाईल, असे सिद्धू यांचे माध्यम सल्लागार सुरिंदर डल्ला यांना सांगितले.
Web Title: Navjot Singh Sidhu Surrendered In Patiala District Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..