
पुण्यातील लाल महालात लावणी; रिल्सच शूटिंग
पुणे : सद्य रिल्स तयार करण्याचा प्रकार चांगलाच वाढलेला आहे. कोणीही रिल्स तयार करून शेअर करीत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यासाठी ते धोकाही पत्कारत असतात. असाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. रिल्स तयार करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये (Lal Mahal) लावणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Planting at Lal Mahal in Pune)
प्राप्त माहितीनुसार, पुण्यातील लाल महालमध्ये (Lal Mahal) रिल्स तयार करण्यासाठी लावणी करण्यात आली. कुलदीप बापट यांनी या रिल्सचे चित्रीकरण केले आहे. तसेच वैष्णवी पाटील यांनी लावणी केल्याचे समोर आले आहे. अशोभनीय आणि धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ सद्य व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर रिल्स शेअर करण्यासाठी चक्क लाल महालमध्ये लावणी करण्यात आली.
हेही वाचा: प्रशांत किशोर म्हणाले, मला चिंतन शिबिरावर भाष्य करण्यास सांगितले जाते
लाल महालात सुरक्षा व्यवस्था असते. असे असतानाही परवानगी न घेता कलावंतांनी शूटिंगसाठी प्रवेश घेतलाच कसा, असा प्रश्न निर्माण होत आहे. लाल महालाभोवती महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले का नाही, हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
चौकशीची मागणी
लावणी (Planting) केल्याच्या व्हिडिओ व्हायरल (Video goes viral) झाल्यानंतर याबाबत सुरक्षा रक्षकाला विचारणा करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षकाने वरिष्ठ नेत्याची परवानगी होती, म्हणून कलावंतांना आत सोडले असे सांगितले. राष्ट्रीय क्षत्रिय जन संसद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Web Title: Planting At Lal Mahal In Pune Video Goes Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..