esakal | नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : पंजाबमध्ये सुरु असलेल्या अनेक राजकीय घडामोडींनंतर माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावर शिक्कामोर्तब केलं. (Navjyot Singh Sidhu appoints President of Punjab Congress committee aau85)

काँग्रेसने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावानं नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संगत सिंग गिलझियान, सुखविंदरसिंग डॅनी, पवन गोयल आणि कुलजीतसिंग नागरा यांची पंजाबच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली.

पंजाबचे मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील झखार यांच्या योगदानाबद्दल काँग्रेस पक्षाच्यावतीनं आभार मानले आहेत. तसेच कुलजीतसिंग नागरा यांना सिक्कीम, नागालँड आणि त्रिपुराच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.

loading image