Narendra Modi on Delhi fire | दिल्ली अग्निकांड: दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी जाहीर केली मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Narendra Modi
दिल्ली अग्निकांड: दुर्घटनेबद्दल खेद व्यक्त करत पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

दिल्ली अग्निकांड: दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

राजधानी दिल्लीत काल एका इमारतीला आग लागून २७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या, तसंच जखमी झालेल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. काल या दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला असून साधारण १२ जण जखमी झाले आहेत.

दिल्लीतल्या मुंडका मेट्रो स्टेशनजवळच्या या इमारतीला काल आग लागली. ३० अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आलं आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली असून जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत देण्यात येणार आहे.

हेही वाचा: दिल्ली अग्निकांड: सकाळपर्यंत २७ मृतदेह हाती, प्रशासनाची माहिती

दिल्लीतल्या या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत, अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत, बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही केजरीवाल यांनी ट्विट करत दिली आहे.

Web Title: Navneet And Ravi Rana Uddhav Thackeray Hanuman Chalisa Row Delhi Hindutva Vsk98

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top