नवनीत राणांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; म्हणाल्या, मला अपेक्षा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

navneet rana

नवनीत राणांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; म्हणाल्या...

नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर खासदार नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यासोबत घडलेल्या घटनांचा संपूर्ण तपशील आपण त्यांना कथन केला असून मला ते न्याय देतील अशी मला पूर्ण खात्री आहे, असं यावेळी राणा म्हणाल्या. (Navneet Rana reaction after meeting Lok Sabha Speaker aau85)

राणा म्हणाल्या, "माझ्यासोबत जे काही घडलंय त्याची संपूर्ण माहिती मी लोकसभा अध्यक्षांना दिली. मला अटक झाली, लॉकअपमध्ये नेलं, त्यानंतर तुरुंगात नेलं, कोणाच्या आदेशानं माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले याची सविस्तर माहिती त्यांना दिली आहे. मला खात्री आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला मला न्याय देतील. त्यांनी यावर दुःख व्यक्त केलं असून अशी घटना कोणत्याही लोकप्रतिनिधीसोबत होता कामा नये, असं त्यांनी म्हटलं"

२३ मे ला नोंदवणार जबाब

२३ तारखेला आपला जबाब लेखी आणि तोंडी स्वरुपात नोंदवला जाणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही मी केली आहे. पोलिसांनी माझ्यावर कसा अन्याय केला याची माहिती मी या जबाबात देणार आहे, असंही यावेळी नवनीत राणा यांनी सांगितलं.

Web Title: Navneet Rana Reaction After Meeting Lok Sabha Speaker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Desh news
go to top