esakal | बंगालमध्ये नवरात्राच्या उत्साहावर विरजणI Bangal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्र

बंगालमध्ये नवरात्राच्या उत्साहावर विरजण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोलकता : कोरोना आणि आर्थिक मंदीमुळे प.बंगालमधील सर्वांत मोठा महोत्सव असलेल्या नवरात्रावर सलग दुसऱ्या वर्षी विरजण पडले आहे. नवरात्र मंडळांना अपुऱ्या प्रायोकजत्वामुळे निधीसाठी हात आखडता घ्यावा लागला असल्याने यंदाही सण साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत.

कोरोनापूर्वी २०० कोटी रुपयांचे प्रायोजकत्व मिळत होते. ते यंदा १०० कोटींवर आले आहे. राजधानी कोलकतामध्ये मोठ्या दुर्गा पूजा समित्यांनी आपल्या खर्चात ३० ते ४० टक्के कपात केली आहे. यात प्रामुख्याने आकर्षक सजावट करणे टाळले आहे. मात्र, यंदाची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असली असून अनेक प्रायोजक खर्च करण्यास तयार असल्याचे काही मोठ्या दुर्गा पूजा समित्यांचे म्हणणे आहे. कोलकत्यातील एका दुर्गा समितीचे प्रवक्ते विकास मजुमदार म्हणाले, की कोरोनापूर्वीच्या २०१९ मधील ५० लाख रुपयांच्या निधीच्या तुलनेत नवरात्रोत्सव मंडळांच्या निधीत यंदा सुमारे ४० टक्के कपात झाली आहे. कोरोनाचा संपूर्ण बाजारपेठेला फटका बसल्याने मोजकेच कार्पोरेट प्रायोजक आहेत. त्यामुळे, खर्च वाचविण्यासाठी चारी बाजूंनी खुला असलेला दुर्गा मंडप उभारला आहे. मंडपासमोरील कारंज्यावर यंदाही कमी रोषणाई केली आहे. दुर्गेची १२ ते १४ फुटांची मूर्तीही नेहमीपेक्षा कमी उंचीची आहे. मात्र, दुर्गापूजेवर अनेक लोकांची रोजीरोटी अवलंबून असल्याने आम्ही सण साजरा करणे पूर्णपणे थांबविले नाही, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

बुर्ज खलिफावर आधारित मंडप

कोलकत्यातील श्रीभूमी स्पोर्टिंग क्लबने दुबईतील जगातील सर्वांत मोठ्या बुर्ज खलिफा इमारतीप्रमाणे यंदा नवरात्राचा मंडप बनविला आहे. तब्बल २५० कारागिरांनी हा १४५ फूट उंचीचा मंडप बनविला. या भव्य मंडपात दुर्गा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून हा मंडप भाविकांचे लक्ष वेधत आहे. हा बंगालमधील सर्वांत मोठा मंडप ठरला आहे.

"प्रायोजक नसल्याने आम्ही खर्चामध्ये ४० टक्के कपात केली आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेत आम्ही आमच्या वर्गणीतील ५० टक्के निधी कोलकत्यातील गरजू दहा मुले व त्यांच्या कुटुंबियांना देणार आहोत. उर्वरित वर्गणी मंडप, मूर्तीवर खर्च केली जाईल."

- स्वरूप विश्वास, प्रवक्ते, पूजा समिती, कोलकता

loading image
go to top