esakal | महानवमीला घेतला तरुणाचा बळी; अघोरी कृत्यानं हादरलं गाव
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

महानवमीला घेतला तरुणाचा बळी; अघोरी कृत्यानं हादरलं गाव

sakal_logo
By
सुधीर काकडे

नवरात्रीच्या पार्श्वभुमिवर रांचीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. रांचीच्या तमाडमध्ये 35 वर्षीय तरुणाचा बळी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तमाड परिसरातील प्रसिद्ध दायरी मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या पिपैडी गावात घडली आहे. ज्या व्यक्तीनं हा खुन केला ती सकाळपासून आज महानवमी असून कुणाचा तरी बळी द्यावा लागेल असं लोकांना सांगत होती असंही समोर आलंय. ठार झालेला तरुण पिपैडी गावाचा रहिवासी होता.

ग्रामीण पोलिस आयुक्त नौशाद आलम यांनी सांगितले की, पिपैडी गावात राहणारा तरुण कुमार महतो गुरुवारी सकाळपासून आज महानवमी आहे, आज कुणाचा बळी द्यावा लागेल असं म्हणत होता. मात्र हा सहज असं बोलत असावा असं समजून लोकांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याने हरधन लोहरा नावाच्या तरुणाला पकडून चाकूने त्याचा गळा कापला. आरडाओरडा ऐकून गोळा झालेल्या गावकऱ्यांनी आरोपीला पकडले आणि हरधनला रुग्णालयात नेले. मात्र रुग्णालयात हरधनचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Video: SIT अॅक्शन मोडमध्ये; तयार केला लखीमपूर घटनेचा 'क्राईम सीन'

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनात देखील मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून चाकूही जप्त करण्यात आला आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करण्यात करत असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकरी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे.

loading image
go to top