

Navy Officer Firing Kills Two
Esakal
भारतीय नौदलातील एका अधिकाऱ्यानं दोन सख्ख्या भावांची गोळ्या झाडून हत्या केलीय. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊत घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. नौबस्ता परिसरात बेछूट गोळीबार झाला. यात तिघांना गोळी लागली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे.