तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांनी केली तेलंगण राज्य समितीची घोषणा

आर. एच. विद्या
Monday, 27 July 2020

तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या असून राज्यात प्रभाव निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी तेलंगण राज्य समितीची घोषणा करुन त्या दिशेने एक पाउल पुढे टाकले आहे. 

सात सदस्यांच्या समितीमध्ये राज्य सचिवपदी हरिभूषण उर्फ यापा नारायण उर्फ लक्ष्मा यांची निवड करण्यात आली आहे.

हैदराबाद - तेलंगणमध्ये नक्षलवाद्यांच्या हालचाली पुन्हा सुरु झाल्या असून राज्यात प्रभाव निर्माण करण्यासाठी नक्षलवाद्यांनी तेलंगण राज्य समितीची घोषणा करुन त्या दिशेने एक पाउल पुढे टाकले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सात सदस्यांच्या समितीमध्ये राज्य सचिवपदी हरिभूषण उर्फ यापा नारायण उर्फ लक्ष्मा यांची निवड करण्यात आली आहे. 

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य पुल्लुरी प्रसाद राव यांच्या निरीक्षणाखाली राज्य समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचबरोबर बडे चोक्क राव उर्फ दामोदर 
यांच्या नेतृत्वाखाली नक्षलवाद्यांनी तेलंगण कृती पथकाची स्थापनाही केली आहे. 

कोरोना दूर ठेवण्यासाठी मुलांना पाजली दारु

नक्षलवाद्यांच्या सक्रियतेमुळे तेलंगण पोलिस सावध झाले असून पोलिस महासंचालक महेंद्र रेड्डी यांनी नक्षलवादी भागांचा दौरा केला. संबंधित जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा करून त्यांनी आवश्यक सूचना दिल्या आहेत.  नक्षलवाद्यांना कोणतीही मदत न करण्याचे आवाहन रेड्डी यांनी तेथील जनतेला केले आहे.

वरवरा राव यांच्या सुटकेची मागणी
पुण्यातील एल्गार परिषदप्रकरणातील आरोपी कवी वरवरा राव यांच्या सुटकेची मागणी नक्षलवाद्यांच्या तेलंगण समितीने केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite announce Telangana State Committee in Telangana