Naxalite Attack On CRPF Camp : सीआरपीएफ कॅम्पवर नक्षलवाद्यांचा हल्ला! तीन जवान शहीद, तर १४ जण जखमी

Naxalite Attack On CRPF Camp : छत्तीसगडमधील विजापूर येथे मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर केलेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत.
Naxalite Attack On CRPF Camp
Naxalite Attack On CRPF Camp

Naxalite Attack On CRPF Camp Latest News : छत्तीसगडमधील विजापूर येथे मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या कॅम्पवर झालेल्या या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. तर या हल्ल्यात 14 जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा-विजापूर जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील टेकलगुडेम गावात असलेल्या सीआरपीएफ कॅम्पवर हा हल्ला झाला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने जवान घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Naxalite Attack On CRPF Camp
Manoj Jarange News Latest : ...अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा अमरण उपोषण; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, सुकमा येथील जगरगुंडा भागात आजच सुरक्षा कॅम्प उभारण्यात आला होता. यानंतर सीआरपीएफचे कोब्रा जवान सर्च ऑपरेशन राबवत होत. दरम्यान, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनीही प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सीआरपीएफचे 3 जवान शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तर 14 जखमी जवानांना एअरलिफ्ट केले जाऊ शकते.

Naxalite Attack On CRPF Camp
Prakash Ambedkar VBA Join MVA : अखेर प्रकाश आंबेडकर 'मविआ'चा भाग; जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com