Manoj Jarange News Latest : ...अन्यथा १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange News Latest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
Manoj Jarange News Latest
Manoj Jarange News Latest

Manoj Jarange News Latest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे की, तुम्ही सगेसोयऱ्यांची परवा जी राजपत्रित अधिसूचना काढली त्याची तातडीने अंमलबजावणी झाली पाहिजे. जरी सरकारने हरकती मागवल्या असल्या तरी अंमलबजावणीला तातडीचा दर्जा देणे गरजेचे आहे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

सगेसोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर १५ दिवसांच्या वेळेनंतर करण्यासाठी अधिवेशन घ्यावं किंवा त्या १५ दिवसातच विशेष अधिवेशन बोलवून आपण त्याचं कायद्यात रुपांतर करावं अशी मागणीही जरांगे यांनी केली आहे.

आपण उद्यापासून अंमलबजावणी सुरू नाही केली तर १० फेब्रुवारीपासून अंतरवाली येथे मी अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांना विचारून हा निर्णय घेतला आहे असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Manoj Jarange News Latest
Prakash Ambedkar VBA Join MVA : अखेर प्रकाश आंबेडकर 'मविआ'चा भाग; जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार?

मराठवाड्यासह महाराष्ट्रात नोंदी सापडत नाहीत म्हणून या सगेसोयरे यांच्या कायद्याची आवश्यता आहे. आपण या कायद्याची अंमलबजावणी केली नाही किंवा कोणाच्या दडपणाखाली येऊन कायदा टिकवण्याची जबाबदारी पार पाडली नाही तर पुन्हा आम्हाला अडचणीचे दिवस यायला नको, असेही जरांगे पाटील म्हणाले.

मुदतवाढ देऊनही आपली समिती काम करत नाहीये. कालच्या सगेसोयरे यांच्या अध्यादेशाची आपण अंमलबजावणी तातडीने करून ज्याची कुणबी नोंद मिळाली त्याचे सगेसोयरे आणि ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला देखील प्रमाणपत्र वाटप होणे आवश्यक आहे. म्हणून आपण १० फेब्रुवारीचा निर्णय घेतला आहे, असेही जरांगे म्हणाले.

Manoj Jarange News Latest
Chandigarh Mayor Election: महापौरपदाच्या निवडणुकीत असं करू शकतात तर... 'इंडिया'च्या पहिल्या पराभवानंतर केजरीवालांची टीका

आपण (राज्य सरकार) ज्या अंतरवालीसह महाराष्ट्रातील केसेस मागे घेण्याचा निर्णय आपण घेतला आहे. पण त्याला चार दिवस उलटून गेले तरी ते झाले नाही. आपण तात्काळ हा शब्द वापरला आहे त्याचा अर्थ काय? सरकारकडून वेगवेगळी विधाने केली जातात त्यामुळे तुमती अधिकृत भूमिका काय असा प्रश्न आम्हाला पडतो असेही जरांगे यावेळी म्हणाले. या केसेस १० फेब्रुवारीच्या आधी मागे घ्याव्यात असेही जरांगे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com