इयत्ता सहावी ते आठवीसाठी एनसीईआरटीतर्फे शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर

NCERT announces academic calendar for class Six to Eight
NCERT announces academic calendar for class Six to Eight

पुणे : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देताना शिक्षकांनी कसे शिकवावे, संदर्भ कसे द्यावेत, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी टप्प्या-टप्प्याने पाठ समजून घेताना नेमके काय करावे, याबाबत मार्गदर्शन करणारी शैक्षणिक दिनदर्शिका राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी)च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी इयत्ता सहावी ते आठवीकरिता असणारी ही शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केल्याची घोषणा ट्‌विटरद्वारे नुकतीच केली आहे. यापुर्वी त्यांनी चार आठवड्यांची दिनदर्शिका जाहीर केली होती. आता पुढील आठ आठवड्याची दिनदर्शिका जाहीर करण्यात आली आहे. 


देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. हे शिक्षण अधिक सुलभ पद्धतीने कसे करता येईल, हे सांगणारी ही दिनदर्शिका आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि संबंधितांसाठी काही मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी ट्‌विट करून याबाबत माहिती दिली आहे. शिकविताना तंत्रज्ञान आणि सोशल मिडिया टुल्सचा वापर कसा करायचे, याबाबत दिनदर्शिकेद्वारे शिक्षकांना दिशा दाखविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकविण्यास हातभार लागणार आहे.

'बिग बी'साठी महिंद्रांनी ट्विट केलं आणि आदर पुनावालांनी दिलं भन्नाट उत्तर

या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांवर असणारा ताण आणि तणाव दूर करण्यास सुचविले आहे. या दिनदर्शिकेत ई-पाठशाला, दीक्षा पोर्टल अशा अध्यायनासाठी उपलब्ध असणाऱ्या सामग्रीचा समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाच्या काळात घरात असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानाची गंगा पोचावी; यासाठी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी शिक्षकांनी एमएमएस पाठवून किंवा फोन करून शिक्षण द्यावे, असेही यात सुचविले आहे. ही दिनदर्शिका एनसीईआरटीच्या https://ncert.nic.in/alternative-academic-calendar.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शैक्षणिक दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये :
- इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय आणि कसे शिकवावे, याबाबत प्रत्येक आठवड्याचे नियोजन.
- ऑनलाईनद्वारे शिकविताना शिक्षकांनी नेमके कोणते संदर्भ पाहावेत, हाताळावेत याचे मार्गदर्शन
- विद्यार्थ्यांनी शिकताना कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे, तसेच पालकांनी विद्यार्थी ऑनलाईनद्वारे शिकत असताना निरिक्षण कसे करावे, हे सांगितले आहे.
- अध्ययन आणि अध्यापन सुलभ व्हावे, याकरिता आवश्‍यक लिंक दिलेल्या आहेत.
- पाठ्यक्रम कसा शिकवावा, यांचे सर्वसाधारण वेळापत्रक आणि आखणी
- शिक्षकांसाठी विषयानुसार पाठ्यक्रम शिकविण्याचे नियोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com